काँग्रेस पक्षाला २०२४ च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी आरास दाखून प्रश्न किशोर स्वतःच फसले

 

काही दिवसनपूर्वी राजकीय विश्लेषक प्रशांत किशोर यांनी काँग्रेस पक्षाला येणाऱ्या ०२४ च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी खरा आरसा दाखवला होता. आगामी काळात भाजपाला हरवणं इतकं सोप्पं नाही. पुढील काही वर्ष भाजपा केंद्रस्थानी राहणार आहे असा अंदाज वर्तवणाऱ्या निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या विधानावरुन नवा वाद निर्नाम होऊन काँग्रेस नेत्यांनी जोरदार टीका केली होती.

सोशल मीडियावरील व्हायरल चर्चेला वगळलं तर प्रशांत किशोर आणि काँग्रेस यांच्यातील नात्यावर याचा काही परिणाम होणार नाही. याची ३ मुख्य कारणं आहेत. एक म्हणजे ज्या कार्यक्रमात प्रशांत किशोर यांनी त्यांचे विचार मांडले ते सगळं ऑफ रेकॉर्ड होतं. कार्यक्रमातील एक व्हिडीओ कुणीतरी बनवला आणि तो व्हायरल झाला. दुसरं म्हणजे प्रशांत किशोर हे काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते नाहीत. त्यामुळे पक्षाचे नियम त्यांच्यावर लागू होत नाहीत.

परंतु व्हिडीओत प्रशांत किशोर यांनी स्पष्टपणे सांगितले की, पुढील काही वर्ष भाजपा राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रशांत किशोर यांना भक्त म्हणण्यास सुरुवात केली. काँग्रेस नेते राहुल गुप्ता यांनी प्रशांत किशोर यांच्यावर निशाणा साधला. काँग्रेसनं किशोर यांना पद ऑफर केलं नाही त्यामुळे ते भाजपाचं गुणगान गाऊ लागले आहेत.

तसेच पुढे बोलताना गुप्ता म्हणाले की, भाजपाच्या चेहऱ्याचा पर्दाफाश झाला आहे. सुरुवातीला काँग्रेस विना विरोधी पक्ष नाही. त्यानंतर काँग्रेसमध्ये पद घेण्यासाठी विनवणी. काँग्रेसनं नाकारलं मग भाजपाच्या पायाशी लोटांगण. निष्कर्ष आणखी एका भक्ताचा मुखवटा उतरला असं गुप्ता यांनी ट्विट करुन म्हटलं आहे.

Team Global News Marathi: