” काँग्रेसचा शेतकऱ्यांच्या भविष्यातील आंदोलनांनाही संपूर्ण पाठिंबा”

 

केंद्र सरकारनं पारित केलेले कृषी कायदें काळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीं जाहीर करून मागे घेतले होते. मोदी यांच्या या निर्याणाइतर सर्वत्र शेतकऱ्यांनी पेढे वाटून स्वागत केले होते तसेच या निर्णयाविरोधात भाजपा नेत्यांनी भाष्य केले होते. मात्र दुसरीकडे गेल्या दीड वर्षांपासून आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांकडे ढुंकूनही न पाहणारे कॉँग्रेसचे खासदार राहूल गांधी यांना आता शेतकऱ्यांचा पुळका आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन नवे कृषि कायदे रद्द करण्याची घोषणा केल्यावर निर्माण झालेल्या उन्मादाच्या लाटेवर पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न केला आहे.शेतकऱ्यांच्या भविष्यातील आंदोलनालाही संपूर्ण पाठिंबा देऊ, असे खुले पत्र राहूल गांधी यांनी लिहिले आहे.राहूल गांधी यांनी म्हटले आहे की, तीन नवे कृषी कायदे रद्द झाल्याने शेतकरी आंदोलकांचा मोठा विजय झाला आहे. शेतकरी भविष्यात करणार असलेल्या इतर आंदोलनांनाही काँग्रेसचा संपूर्ण पाठिंबा राहील.

राहुल गांधी आपल्या ट्विटमध्ये म्हणतायत की, ‘लिहून घ्या माझे शब्द, सरकारला शेतकरीविरोधी कायदे मागे घ्यावे लागतील’, शेतकऱ्यांचा लढा अजून संपलेला नाही. शेतकऱ्यांची गुलामासारखी स्थिती करण्याचे कारस्थान पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करू नये. त्याऐवजी मोदींनी २०२२पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन प्रत्यक्षात आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न करावेत. आपला फायदा व तोटा कशात आहे हे शेतकऱ्यांना नीट कळते. राजकारणाचा उपयोग जनहितासाठी करायचा असतो. लोकशाहीमध्ये अहंकाराला जागा नसते, असेही त्यांनी म्हटले आहे.

Team Global News Marathi: