अनुसूचित जाती आणि जमातीच्या विकासासाठी काँग्रेस कटिबद्ध – बाळासाहेब थोरात

अनुसूचित जाती आणि जमातीच्या विकासासाठी काँग्रेस कटिबद्ध – बाळासाहेब थोरात

राज्यातील दलित आणि आदीवासी समाज घटकांसाठी राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजना संदर्भात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे पत्र काँग्रेस शिष्टमंडळाने सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट घेऊन त्यांना सुपूर्त केले.

या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, सोनिया गांधी यांनी अनुसूचित जाती, जमातींच्या योजनांबाबत दिलेल्या सूचना रास्त असून, सरकारचा घटक पक्ष म्हणून काँग्रेसने कायम या समाजघटकांना न्याय देण्याची भूमिका घेतलेली आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनीही याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती त्यांनी दिली होती.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे जसे मार्गदर्शन करीत असतात. तसेच काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यासुद्धा मार्गदर्शन करतात. उभय नेत्यांची प्रत्यक्ष भेट झालेली नसली तरी हा पत्ररूपी संवाद आहे. असे थोरात यांनी सांगितले.

 

दलित व मागासवर्गीय समाजाच्या कार्यकर्त्यांची एक बैठक काँग्रेस पक्षाने आयोजित केली होती. या बैठकीत काही मुद्दे चर्चेत आले होते त्या संदर्भात सोनियाजी यांनी पत्र लिहून काही सुचना केल्या आहेत.

ग्लोबल न्युज नेटवर्क: