काँग्रेस पाठोपाठ देवेंद्र फडणवीस यांनी साधला शरद पवारांवर निशाणा !

 

शरद पवारांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पवारांना खडेबोल सुनावले होते मात्र, त्याच मुद्द्यावरून आता राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसला टोला लगावला आहे. त्यामुळे शरद पवारांची भूमिका आणि त्यावरून भाजपाकडून केली जाणारी टीका येत्या काही दिवसांत महाराष्ट्राच्या राजकारणात पाहायला मिळू शकते.

देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील मंदिरं न उघडण्याच्या सरकारच्या निर्णयावर देखील निशाणा साधला. ‘मंदिरं सुरू करण्याची आमची मागणी आहे. आम्ही हिंदू आहोत. आमचे ३३ कोटी देव आहेत. जिथे आम्ही मानू, तिथे आमचे देव आहेत. पण या मंदिरांवर अवलंबून असणारे लाखो लोक आहेत. कुणी फुलं विकतं, कुणी उदबत्ती विकतं, कुणी प्रसाद विकतं, हळद-कुंकू विकतंय. मंदिरांवर अवलंबून असणारे पुजारी, सेवक आहेत त्यांच्या उदरनिर्वाहाचं काय असा प्रश्न फडणवीसांनी उपस्थित केला होता.

गेल्या दोन वर्षांत या लोकांची विदीर्ण अशी अवस्था झाली आहे. म्हणून आम्ही मागणी केली की मदिरालय सुरू होऊ शकतं, तर मंदिरं का सुरू होऊ शकत नाहीत? सोशल डिस्टन्सिंगचे नियम नक्कीच पाळले जावेत. देशभरात सर्व राज्यांमध्ये मंदिरं सुरू आहेत, फक्त महाराष्ट्रात मंदिरं बंद आहेत. त्यामुळे सगळ्यांना गणरायांनी सुबुद्धी द्यावी, तशी सुबुद्धी सरकारलाही लाभू देत’, असं फडणवीस यावेळी बोलून दाखवला होतं.

Team Global News Marathi: