राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना चंद्रकांत पाटलांकडून शुभेच्छा तर मुख्यमंत्री ठाकरेंना चिमटा
राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांचा ८० वा वाढदिवस या निमित्ताने संपूर्ण देशभरातून वाढदिवसानिमित्त शुभेच्छाच वर्षाव होतं आहे. त्यात भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूड मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी वाढदिवसानिमित्त पवारांना शुभेच्छा दिल्या आहेत तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना चिमटा काढला आहे.
राजकारणात मतभेद असतात, मात्र मतभेद कधीच नसतात. भिन्न विचारांच्या पण मार्गदर्शन असलेल्या शरद पवार यांचा आज वाढदिवस. शरद पवारांना राजकारणाचा तब्बल ५० वर्षाचा अनुभव आहे. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी ३ वेळा पदभार सांभाळला. राज्याच्या हितासाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले. त्यांच्या विशेष निर्णय म्हणजे स्थानिक स्वराज संस्था मध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण देऊन त्यांना शासन निर्णय प्रक्रियेत सामील करून घेणं.
भारताचे कृषी मंत्री असताना शरद पवारांनी शेती दुग्ध उत्पादन क्षेत्रात वाखाणण्याजोगे प्रयत्न केले शेतकरी सर्व बंधनातून मुक्त होऊन जीवनात पुढे जाऊ शकतात. अशा सर्व विधेयकांना शरद पवार यांच्याकडून समर्थन मिळाले आहे आणि पुढेही मिळेल.
कोरोना काळातही आपल्या वयाची पर्वा न करता आपल्या सहयोगी पक्षातील काही नेत्यांना लाजवतील असे दौरे केले. राजकारणात आपले विचार आणि आपले आदर्श हे वेगळे राहतील परंतु महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी आपला सरकारमध्ये आणि सरकारच्या बाहेर देखील नेहमीच मार्गदर्शन करत राहाल. अशी मी आंबाबाईकडे प्रथम करतो’ असे ट्विट त्यांनी केले आहे