काळजी वाढली: राज्यात दिवसभरात ९ हजार १७० नव्या कोरोनाबाधितांची नोंद

काळजी वाढली: राज्यात दिवसभरात ९ हजार १७० नव्या कोरोनाबाधितांची नोंद

मुंबई :- राज्यातील कोरोना (Corona) संसर्ग पुन्हा एकदा वेगाने वाढत आहे. दररोज आढळणाऱ्या रुग्णांची संख्या ही मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. राज्यातला कोरोना रुग्णांचा आकडा १० हजारांजवळ पोहचला आहे.

आज दिवसभरात राज्यात ९ हजार १७० नवीन कोरोनाबाधित आढळल्याचे समोर आले आहे. तर, मुंबईत ६ हजार ३४७ नव्या कोरोनाबाधितांची आज नोंद झाली आहे. याशिवाय राज्यात आज सात कोरोनाबाधित रुग्णांचा तर मुंबईत एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्युदर २.११ टक्के एवढा आहे.

तर, आज राज्यात १ हजार ४४५ मुक्त झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ६५,१०,५४१ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिक्व्हरी रेट ) ९७.३५ टक्के एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण ३२,२२५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६६,८७,९९१ झाली आहे.

आजपर्यंत राज्यात १,४१,५३३ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,९१,३६,६४३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६,८७,९९१ (९.६७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,२६,००१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १०६४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: