सोलापूर जिल्ह्याची चिंता वाढवणारी बातमी: जिल्ह्यात आज 1479 कोरोना रुग्णांची वाढ,24 मृत्यू

सोलापूर जिल्ह्याची चिंता वाढवणारी बातमी: जिल्ह्यात आज 1479 कोरोना रुग्णांची वाढ,24 मृत्यू

सोलापूर : शहरातील 12 हजार 871 पुरुषांना तर आठ हजार 675 महिलांना तर ग्रामीणमधील 36 हजार 289 पुरुषांना आणि 22 हजार 21 महिलांना कोरोनाची बाधा झाली आहे. आज शहरात 257 रुग्णांची वाढ झाली असून पाच रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दुसरीकडे ग्रामीण भागात आज 1222 रुग्ण वाढले असून 19 जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे, शहरातील तीनशे तर ग्रामीणमधील 991 रुग्णांनी कोरोनावर मात करीत आज घर गाठले.

शहर-जिल्ह्यातील रुग्णसंख्या आता 80 हजारांकडे वाटचाल करू लागली आहे. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात रुग्णांचा आलेख वाढत असून मृत्यूही वाढल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. आज अक्‍कलकोट व माढा तालुक्‍यातील प्रत्येकी तीन, बार्शी, माळशिरस, मोहोळ, दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील प्रत्येकी दोन तर पंढरपूर तालुक्‍यातील सर्वाधिक चार तर सांगोल्यातील एका रुग्णाचा आज मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे करमाळा, मंगळवेढा, उत्तर सोलापूर तालुक्‍यातील एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. आतापर्यंत शहरातील 896 तर ग्रामीणमधील एक हजार 398 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

 

 

आज दि.18 एप्रिलच्या आकडेवारीनुसार सोलापूर ग्रामीणमध्ये तब्बल 1222 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय.

एकाच दिवशी 19 जणांचा मृत्यू झाला अशी माहिती देण्यात आली.

आज 18 एप्रिल रोजी सोलापूर ग्रामीण भागातील 1222 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 723 पुरुष तर 499 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 991 आहे. यामध्ये 590 पुरुष तर 401 महिलांचा समावेश होतो. आज 19 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

सोलापूर शहरात आज गुरुवारी दि.18 एप्रिल रोजी कोरोनाचे नवे 257 रुग्ण आढळले असून यामध्ये 166 पुरुष तर 91 स्त्रियांचा समावेश आहे.

आज एकूण 8651 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 7429 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
सोलापुरात शहरी भागातील कोरोना बाधितांची संख्या पुन्हा एकदा वाढत आहे. धक्कादायक बाब म्हणजे आज पुन्हा एकदा, एकाच दिवशी कोरोनाने तब्बल 5 जणांचा बळी घेतला आहे.शहरातील मृत्यूदर पुन्हा वाढत असल्याचे दिसून येत आहे.

 

 

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: