काळजी वाढली: राज्यात कोरोना बधितांचा नवा उच्चांक;वाचा कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण

महाराष्ट्रात आज आज २० हजार रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, पण त्याचवेळी ३५ हजार ९५२ नव्या कोरोना रुग्णांचे निदान झाले आहेत. त्यामुळे राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या २ लाख ६२ हजार ६८५ वर पोहचली आहे. गेल्या ४८ तासात १११ मृत्यूची नोंद झाली आहे.

 

त्यातील ६६ मृत्यू हे गेल्या ४८ तासांमधील आहेत. २८ मृत्यू हे गेल्या आठवड्यातील आहेत. उरलेले १७ त्यापूर्वीचे आहेत. मुंबईत आज एका दिवसात ५५०५ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. त्याचवेळी सभोतालच्या महामुंबई परिसरातही मोठ्या संख्येने रुग्ण संख्या वाढत आहे. तसेच कोरोना रुग्णांची संख्या पुणे जिल्ह्यात साडेसहा हजाराकडे तर नाशिक आणि नागपूर या दोन जिल्ह्यांमध्ये  साडे तीन हजाराच्या जवळपास आहे.

आज राज्यात ३५,९५२ नवीन रुग्णांचे निदान.

आज २०,४४४ रुग्ण बरे होऊन घरी

राज्यात सध्या एकूण २,६२,६८५ सक्रिय रुग्ण आहेत.

राज्यात आजपर्यंत एकूण २२,८३,०३७ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.

यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८७.७८ % एवढे झाले आहे.

राज्यात आज १११ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. १११ मृत्यूंपैकी ६६ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २८ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १७ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत.

सध्या राज्यातील मृत्यूदर २.०७ % एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,८८,७८,७५४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २६,००,८३३ (१३.७८ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

सध्या राज्यात १३,६२,८९९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.

१३,७७० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

 

 

कोरोना बाधित रुग्ण:

आज राज्यात ३५,९५२ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या २६,००,८३३  झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

मुंबई मनपा    ५५०५

ठाणे    ४४९

ठाणे मनपा    ९८०

नवी मुंबई मनपा      ७५६

कल्याण डोंबवली मनपा १०२७

उल्हासनगर मनपा     ११६

भिवंडी निजामपूर मनपा ६५

मीरा भाईंदर मनपा    २१०

पालघर  १४०

वसईविरार मनपा      १९२

रायगड  २१४

पनवेल मनपा  ४०८

नाशिक  १०७८

नाशिक मनपा  २३०४

मालेगाव मनपा ४१

अहमदनगर    ८५८

अहमदनगर मनपा     ४५५

धुळे    १९८

धुळे मनपा     १६६

जळगाव ७३४

जळगाव मनपा १२८

नंदूरबार ५३१

पुणे    १३४०

पुणे मनपा     ३३४०

पिंपरी चिंचवड मनपा  १७४७

सोलापूर ३१५

सोलापूर मनपा  २८६

सातारा  ३६३

कोल्हापूर ५५

कोल्हापूर मनपा ३८

सांगली  ८९

सांगली मिरज कुपवाड मनपा  ५७

सिंधुदुर्ग ४७

रत्नागिरी      २३

औरंगाबाद      ५२२

औरंगाबाद मनपा      १३८०

जालना  ३३७

हिंगोली  ३३

परभणी  ९

परभणी मनपा  ४०२

लातूर   ३०५

लातूर मनपा   २१४

उस्मानाबाद    १७८

बीड    ३४५

नांदेड   ४५३

नांदेड मनपा    ९५८

अकोला  १४२

अकोला मनपा  ३२२

अमरावती      ९८

अमरावती मनपा १७८

यवतमाळ      ३५२

बुलढाणा ६०२

वाशिम  ३११

नागपूर  १०१४

नागपूर मनपा  २६५६

वर्धा    ३०९

भंडारा   २४१

गोंदिया  ८६

चंद्रपूर   १०७

चंद्रपूर मनपा   १०७

गडचिरोली     ३६

नागपूर एकूण  ४५५६

एकूण           ३५,९५२

(टीप- आज नोंद झालेल्या एकूण १११ मृत्यूंपैकी ६६ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २८ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १७ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे १७ मृत्यू पुणे-९, पालघर-७ आणि ठाणे-१ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.

ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

(ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या २५ मार्च २०२१च्या अद्ययावत आकडेवारीवरून तयार करण्यात आली आहे.)

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: