राज्यातल्या ‘या’ भागात येत्या तीन-चार दिवसात अवकाळी पावसाचा हवामान खात्याने दिला इशारा

 

मुंबई | राज्यात हवामान खात्यासंदर्भात मोठी बातमी समोर येत आहे. राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये सध्या थंडीची लाट आहे. मात्र थंडीची लाट असली तरी काही दिवसात अवकाळी पाऊस होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या दिवसात राज्यातल्या काही भागात अवकाळी पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

सध्या काही भागात थंडी आहे. त्यात उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात थंडी आणि धुक्याचं साम्राज्य आहे. त्यामुळे येत्या २ फेब्रुवारीपर्यंत असंच वातावरण राहणार असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे. तसेच 3 फेब्रुवारीपासून वातावरण ढगाळ राहील आणि पावसाची शक्यता आहे, असंही हवामान खात्यानं स्पष्ट केलं आहे.

राज्यात उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात २ ते ४ फेब्रुवारीला अवकाळ पाऊस होऊ शकतो. अवकाळी पावसाच्या अंदाजामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. तसेच या जिल्ह्यांमध्ये हुडहुडी फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून थंडीचा जोर कमी होईल. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात गेल्या अनेक दिवसांपासून थंडीची लाट सुरु आहे.

Team Global News Marathi: