दिलासादायक: पुण्यात नव्या कोरोना रुग्णापेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त

ग्लोबल न्यूज – पुणे महानगरपालिका हद्दीत आजही (दि. 26 एप्रिल) नव्या रुग्णसंख्येपेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक नोंदवली गेली आहे. आज 2538 इतक्या नव्या तर 4351 कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या आहे.

आज पुणे परिसरातील 70 रुग्णांचा तर पुण्याबाहेरील 16 रुग्णांचा मृत्यू झाला असून 1371 गंभीर रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आज दिवसभरात 16112 नमुन्यांची (स्वॅब) तपासणी करण्यात आली आहे.

आजपर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 402655 इतकी झाली आहे. तर ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 47420 वर पोहोचली आहे. तसेच आजपर्यंत एकूण 6554 रुग्णांचा मृत्यू झाला. तर 3 लाख 48 हजार 681 जणांना आजपर्यंत डिस्चार्ज मिळाला आहे.

तरीही नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. तोंडाला मास्क, हात धुणे आणि शारीरिक आंतरपालन करण्याचे आवाहन पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: