संजय राठोड यांच्या अडचणी वाढणार, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी घातले लक्ष

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी भारतीय जनता पक्षाने लावलेले आघाडी सरकारवर आरोप आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून उमटत असलेल्या प्रतिक्रिया याची दाखल खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांनी घेतलेली आहे. तसेच या प्रकरणात जातीने लक्ष मुख्यमंत्र्यांनी घातलेले दिसून येत आहे.

पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन या प्रकरणाची माहिती दिल्याचे खात्रीदायक सूत्राच्या माध्यमातून समोर येत आहे. राज्यात पूजा चव्हाण यांचे प्रकरण चांगलेच तापू लागलेले आहे.

त्यात आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याची गंभीर दखल घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना वर्षा निवासस्थानी बोलावून घेतले होते. गुप्ता यांनी वर्षावर येऊन पूजा आत्महत्या प्रकरणाच्या तपासाची सर्व माहिती मुख्यमंत्र्यांना दिली. आत्महत्या कशी झाली? प्रत्यक्ष साक्षीदारांच्या नोंदी, मेडिकल रिपोर्ट आदींची गुप्ता यांनी मुख्यमंत्र्यांना दिल्याचे खात्रीदायक सूत्रांनी सांगितले आहे.

Team Global News Marathi: