मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या बड्या नेत्याची बैठक सुरु

शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या बड्या नेत्यांची बैठक वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी पार पडणार आहे. या बैठकीला सेनेचे सर्व मंत्री, आमदार, खासदार, राज्यातील सर्व जिल्हा संपर्कप्रमुख आणि जिल्हा प्रमुख उपस्थित राहणार आहेत.

शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवसेनेची ही पहिलीच मोठ्या स्थरावरील बैठक मुंबई येथे आयोजित करण्यात आलेली आहे. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहे. या संदर्भात टीव्ही ९ ने वृत्त दिले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीत संपूर्ण राज्यभरात शिवसेना अधिक बळकट करण्याच्या निर्णयावर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यात झालेल्या ग्रामपंयातीच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेला घवघवीत यश मिळले होते. असेच यश येणाऱ्या सर्व मनपा निवडणुकीला मिळावे या संदर्भात चर्चा होणार आहे.

 

Team Global News Marathi: