मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मोठा निर्णय,प्रसिद्धीसाठी करणार इतके कोटी खर्च

 

राज्यात राज्य सरकारकडून अनेक योजना, उपक्रम राबविण्यात आलेल्या आहेत. मात्र, त्याची जनतेला माहिती नसल्याने त्या जनतेपर्यंत पोहचतच नाहीत.त्या योजनांची जनतेला माहिती व्हावी म्हणून ठाकरे सरकारच्या वतीने एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. ती म्हणजे राज्यात विविध शासकीय योजना, शासकीय संदेश आणि शासकीय कामे याच्या प्रसिद्धीसाठी तब्बल साडे सोळा कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे शासकीय योजना, कामाची प्रसिद्धी विविध माध्यमातून केली जाणार आहे.

राज्य सरकारच्यावतीने आज महत्वाचा निर्णय घेण्यात आला. त्यात राज्य सरकारकडून विविध शासकीय उपक्रम, योजना राबविल्या जातात. त्यांना प्रसिद्धीही दिली जाते. त्यामुळे शासनाने राबविल्या योजनांची नागरिकांना माहिती मिळाल्यानंतर त्याचा लाभ लोकांकडून घेतला जातो. राज्य सरकारने घेलेल्या निर्णयात कृषी, आरोग्य यासह इतर विभागात ज्या शासकीय योजना आहेत. त्याचा यात समावेश करण्यात आलेला आहे.

राज्य सरकारने राबविलेल्या तसेच राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजना, उपक्रमांची माहिती जनतेला व्हावी आणि जनतेने लाभ घेणे आवश्यक आहे. त्यासाठी सोशल मीडिया, फेसबुक, ट्विट्सह इतर माध्यमातून शासकीय योजनांची प्रसिद्धी होणे आवश्यक आहे. म्हणून राज्य सरकारे आज यासाठी तब्बल साडे सोळा कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे.

Team Global News Marathi: