मुख्यमंत्री म्हणाले ‘भावी सहकारी’, आज फडणवीस-जयंत पाटील एकाच गाडीत!

 

शुक्रवारी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर होते. यावेळी, त्यांनी एका कार्यक्रमात, मंचावर उपस्थित भाजपच्या नेत्यांकडे पाहून त्यांचा, ‘भावी सहकारी’ असा उल्लेख केल्यानंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चेला उधाण आले होते.

दरम्यान, शुक्रवारच्या सगळ्या राजकीय धुराळ्यानंतर आज नंदुरबारमध्ये एका कार्यक्रमासाठी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील एकाच गाडीतून आल्याने अनेकांना जोरदार धक्का बसला होता. मुख्यमंत्र्यांनी औरंगाबादमध्ये केलेल्या व्यक्तव्यानंतर आजच फडणवीस-पाटील एकाच गाडीतून आल्याने पुन्हा एकदा राजकीय तर्कविर्तक लावले जात होते.

ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी आणि सहकार महर्षी पी .के आण्णा पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा आज होत आहे. यासाठी ठाकरे सरकारमधील तिन्ही पक्षातील ज्येष्ठ नेते आणि विरोधी भाजपचे नेते एकाच मंचावर असणार आहेत. यामध्ये फडणवीस आणि पाटील यांच्यसह मंत्री के सी पाडवी, माजी मंत्री गिरीश महाजन, जयकुमार रावल, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे राजकीय नेते उपस्थितीत राहणार आहेत.

Team Global News Marathi: