कोलकाता – पश्चिम बंगालच्या (West Bengal) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (CM Mamata Banarjee) यांच्या लहान भावाचे कोरोनामुळे निधन झाले. असीम बंडोपाध्याय (Aseem Bandopadhyay) असं त्यांच नाव होतं. एक महिन्यापूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर सर्व प्रोटोकॉलनुसार अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. कोलकात्यातील मेडिका सुपरस्पेशालिटी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. गेल्या एक महिन्यापासून सुरु असलेली त्यांची झुंज आज संपली. (cm mamata banerjee s brother ashim banerjee passes away due to corona)
असीम यांची प्रकृती आज सकाळी अचानक बिघडली होती. त्यांच्या निधनाबाबत कोलकात्यातील मेडिका सुपरस्पेशालिटिकी रुग्णालयाचे चेअरमन डॉक्टर अलोक रॉय यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, ममता बॅनर्जी यांचे लहान बंधू असीम यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. शनिवारी सकाळी असीम बंडोपाध्याय यांची प्राणज्योत मालवली.
West Bengal Chief Minister Mamata Banerjee's younger brother Ashim Banerjee passed away today at the hospital. He had tested positive for #COVID19 and was undergoing treatment: Dr Alok Roy, Chairman, Medica Superspecialty Hospital, Kolkata
— ANI (@ANI) May 15, 2021
ममता बॅनर्जींच्या भावाच्या निधनानंतर पश्चिम बंगाल काँग्रेसच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. ट्विटरवरून श्रद्धांजली वाहताना ममता बॅनर्जींसह त्यांच्या कुटुंबाच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. भावाच्या निधनाचा धक्का सहन करण्याची ताकद परमेश्वर तुम्हाला देवो अशी प्रार्थना करण्यात आली आहे.