मुख्यमंत्र्यांच्या चांगल्या प्रकृतीसाठी शिवसैनिकाचे विठ्ठलाला साकडे !

 

सांगली | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मानेच्या त्रासामुळे त्रस्त असल्यामुळे त्यांच्यावर मुंबईतील गिरगाव येथील रिलायन्स रुग्णालयात छोटीशी शास्त्रकिया करण्यात आली होती. तसेच त्यांच्या तब्येतीबद्दल राज्यातील सर्व शिवसैनिकांनी देवाला साकडे घातले होते. त्या पाठोपाठ आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती खणखणीत व्हावी, यासाठी सांगली जिल्ह्यातील शिवसैनिक संजीवकुमार सावंत आणि त्यांच्या पत्नी रूपाली सावंत यांनी ८० किलोमीटर अंतर पायी येऊन पंढरीची वारी पूर्ण केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर दोन दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.या शस्त्रक्रियेनंतर त्यांना आराम मिळावा, यासाठी त्यांनी वारी केली. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील बनाळी येथील ते रहिवासी आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रुग्णालयात दाखल, छोटीशी शस्त्रक्रिया होणार, सर्व्हायकल आणि पाठदुखीच्या वेदनांनी त्रस्त शस्त्रक्रिया झाल्यावर मुख्यमंत्र्यांना निरामय आरोग्य लाभावे, असे साकडे शिवसैनिक संजीवकुमार सावंत यांनी विठ्ठलाला घातले होते.

त्यानुसार संजीवकुमार सावंत यांनी तीन दिवसात अनवाणी८० किलोमीटरचे अंतर पार करत पंढरीची वारी पूर्ण केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विठ्ठलाचे निस्सीम भक्त आहेत. त्यांची विठ्ठलावर अढळ श्रद्धा आहे. हीच भावना ठेवून संजीवकुमार सावंत यांनी त्यांच्याविषयी असलेल्या प्रेमापोटी सपत्नीक पंढरीची पायी वारी पूर्ण केली. त्यांना दीर्घायू लाभू दे, असे विठ्ठलाला साकडे घातले.

Team Global News Marathi: