कोकणात ढगफुटीचा हवामान खात्याचा इशारा; रत्नागिरी जिल्ह्यात हाय अलर्ट जारी

मुंबई : महाराष्ट्राच्या दक्षिणेत मान्सून दाखल (Monsoon in Maharashtra) झाल्याने मुंबईच्या उपनगरात (suburbs of Mumbai) आणि राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाला (Torrential rain) सुरुवात झाली आहे. आज मुंबईत धुवांधार पाऊस सुरू आहे. इतकच नाही तर भारतीय हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, कोकण विभागाला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पुढील दोन दिवस कोकणात ढगफुटी होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवण्यात आला आहे. तर रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यात पुढील दोन दिवस हाय अलर्ट जारी केला आहे.

मागील आठवड्यापासून महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीसह कोकणात मुसळधार पाऊस कोसळत आहे. अशात 11 आणि 12 जून रोजी रत्नागिरी जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यादिवशी रत्नागिरीत पडणारा पाऊस ढगफुटी प्रमाणे असेल असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांनी प्रशासनाला सज्ज राहण्याचा आदेश दिला आहे. 11 आणि 12 जून रोजी रत्नागिरी जिल्ह्यात तब्बल 200 मिलीमीटरपर्यंत पाऊस पडू शकतो. त्यामुळे या दोन दिवशी खबरदारीची उपाय म्हणून जिल्ह्यात कर्फ्यु लागू करण्यात येणार असल्याचे संकेत जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांनी दिले आहेत. त्याचबरोबर रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, चिपळूण, राजापूर या तीन नगरपालिकेतील 31 गावांसाठी सतर्कतेचा इशारा जारी करण्यात आला आहे. अतिवृष्टी झाल्यानंतर नदीला पूर येऊन पाणी संबंधित गावात शिरू शकते. त्यामुळे या गावांना अधिक धोका आहे.

मुंबईसह कोकणात पुढील तीन दिवस अतिवृष्टी होण्याची शक्यता

तर रायगड(Raigad) जिल्ह्यातही दोन दिवसापासून पावसाचे आगमन झाले. अशात 10 ते 11 जूनला जिल्ह्यात अतिवृष्टी होणार असण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस रायगडकरांसाठी धोकादायक असणार आहेत. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सर्व यंत्रणांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. यामुळे गरज नसल्यास घराबाहेर पडू नका आणि अतिमहत्त्वाच्या कामासाठी हवामानाचा अंदाज घेतच बाहेर पडा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

तसेच समुद्र, नदी, धरण वाहत्या पाण्यात जाण्यासखरंतर पुढच्या चार दिवसांमध्ये मुंबईसह राज्यभरात प्रत्येक जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला. त्याच पार्श्वभूमीवर पावसाला सुरुवात झाली असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. मुंबईसह कोकण किनारपट्टीवर देखील ढगाळ वातावरण आहे. यामुळे मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये काळोख दाटल्याचं पाहायला मिळतं. मुंबईच्या बऱ्याच भागात पावसाने हजेरी लावल्यामुळे मुंबईची पुन्हा तुंबई झाली आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: