सिबिल (CIBIL) स्कोअर का महत्त्वाचा, तो कसा सुधारायचा?

 

आपल्याला लोन घ्यायचं असतं. आपण सगळी कागदपत्र तयार ठेवतो आणि बँकेत जेव्हा लोनसाठी अर्ज करतो तेव्हा मात्र आपली निराशा होते. लोन घेण्याआधी तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी माहिती असायला हव्यात. त्यापैकी एक म्हणजे CIBIL स्कोअर आहे. तुमच्या CIBIL स्कोअरवर तुम्हाला लोन द्यायचं की नाही ते ठरत असतं.

आता CIBIL स्कोअर म्हणजे काय?

जेव्हातुम्ही बँकेकडून जेव्हा क्रेडिट कार्ड घेता तेव्हापासून तुम्ही किती आणि कसं पेमेंट केलं याबाबत बँक तुमच्यावर नजर ठेवून असते. सिबिल स्कोअर हा तुमच्या क्रेडिट हिस्ट्रीचा तीन अंकी संख्यात्मक एक कोड असतो. तुमच्या पेमेंट हिस्ट्रीवरून तो स्कोअर काढला जातो. योग्य वेळी पेमेंट पूर्ण केलं असेल तर तो स्कोअर चांगला असतो.

पेमेंट उशिरा किंवा बुडवलं असेल तर तुमचा स्कोअर वाईट येऊ शकतो. त्याचीही अनेक कारण असू शकतात. फ्री-क्रेडिट स्कोअर फॉर्ममध्ये, आपली वैयक्तिक माहिती जसे की, नाव, जन्मतारीख, पिन कोड इत्यादी अपलोड करा. आपला पॅन कार्ड नंबर आणि ओटीपी द्या. आता ‘गेट युवर क्रेडिट स्कोअर’वर क्लिक करा. तिथे तुम्हाला तुमचा स्कोअर किती आहे ते पाहता येईल. तुम्ही सिबिल वेबसाईटवरूनही चेक करू शकता.

आपल्या सिबिल स्कोअरवर बँक ठरवते की कोणाला किती लोन द्यायचं. लोन देण्यासाठी ही व्यक्ती योग्य आहे की नाही. व्यक्तीला लोन द्यायचं की नाही या सगळ्या गोष्टी बँक ठरवत असते. त्यामुळे तुम्हाला लोन घ्यायचं असेल तर या गोष्टी पाहाणं महत्त्वाचं आहे. सिबिल स्कोअर जेवढा चांगला तेवढं जास्त तुम्हाला लोन मिळतं. जेवढा सिबिल स्कोअर कमी तेवढं तुमचं नुकसान आहे.

तुमच्या क्रेडिट कार्डचं पेमेंट वेळेत करा. त्यामुळे तुमचा स्कोअर खूप चांगला राहील. तुमचं जेवढं लिमिट आहे तेवढं सगळं कधीच वापरू नका. क्रेडिट लिमिटचा नेहमी 50 टक्के खर्च करा. त्यामुळे तुमचं इंप्रेशन चांगलं राहील.

Team Global News Marathi: