चोरीची नवी ट्रिक | तेल लावून नग्न फिरून करायचा चोरी अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

 

सध्या मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत चोरीच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून ठाण्यातील दिघा परिसरात चोरी करण्यासाठी चोराने वापरलेल्या नव्या शक्कलची आता सर्वत्र चर्चा होताना दिसून येत आहे. रात्रीच्या अंधारात तो निर्वस्त्र होऊन रस्त्यावर फिरायचा. अंगाला तेल लावून चालायचा आणि चोरी करायचा.

मुंबईच्या जवळ असलेल्या असलेल्या ठाणे जिल्ह्यातील दिघा परिसरात नग्न चोराची दहशत हळूहळू वाढू लागली होती. निर्वस्त्र होऊन तो फिरायचा यामुळे नागरिकांमध्ये आधीच घबराट होती आणि आपल्याला कुणी पकडू नये किंवा पकडलं तर लगेच निसटता यावं यासाठी तो अंगावर तेल लावून फिरायचा. मात्र अखेर नवी मुंबईतील कळवा परिसरात राहणारा हा चोरटा अखेर पकडला गेला आहे.

रात्री उशिरा आणि पहाटे मौल्यवान वस्तू चोरण्यासाठी बाहेर पडणाऱ्या या चोरट्याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी कारवाईची तयारी केली. नवी मुंबईच्या रबाळे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज पाहून चोरट्याला पकडण्यास सुरुवात केली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी दिघा परिसरातील चिंचोळ्या गल्ल्यांमध्ये फिरताना दिसला.

गेल्या चार दिवसांपासून हा व्हिडिओ व्हायरल होत होता. ज्यांनी हा व्हिडिओ पाहिला, त्यांच्या मनात घबराट पसरली. आपल्या जवळ कुणी येऊ नये यासाठी तो नग्न अवस्थेत फिरायचा. त्याची दहशत वाढत होती. त्यानंतर पोलिसांनी रात्री संबंधित परिसरात सापळा रचून चोराला पकडलं. कळवा भागातील या २४ वर्षीय चोरट्याला रबाळे पोलिसांनी अटक केली आहे.

Team Global News Marathi: