चित्रा वाघ यांच्याकडून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा ‘तो’ व्हिडीओ ट्वीट; तर पटोले कोर्टात

 

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओची चर्चा रंगल्याचं पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ आहे, महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा हा व्हिडिओ असून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओमध्ये नाना पटोले एका महिलेसोबत चेरापुंजीत असल्याचं पाहायला मिळत आहे. व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून माध्यमांशी बोलताना व्हिडीओविरोधात न्यायालयात जाणार असल्याचं नाना पटोले यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे चित्र वाघ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नाना पटोलेंवर नेटकऱ्यांनी निशाणा साधला. याबाबत बोलताना नाना पटोलेंनी चित्रा वाघ यांच्याविरोधात न्यायालयात जाणार असल्याचं स्पष्ट केलं. तसेच हा बदनाम करण्याचा कट असून व्हिडीओविरोधात कारवाई करणार असल्याचंही ते म्हणाले. नेटकऱ्यांनीही नाना पटोले यांना आज चांगलेच ट्रोल केले. मेघालय राज्याच्या चेरापुंजी येथील एका हॉटेलमध्ये महिलेसोबत गळ्यात हात टाकून खुर्चीवर बसल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल झाला. त्यामुळे नानांच्या विरोधात टीकेची झोड उठलेली आहे.

मात्र या दरम्यान नाना पटोले यांना विचारपूस केली असतां त्यांनी हे भाजपचा कट कारस्थान असल्याचा आरोप केलाय. या विरोधात आम्ही न्यायालयात दाद मागणार असल्याचंही नाना पटोले म्हणाले. महाराष्ट्रातील राजकारणाची पातळी खालवली असून माझी वैयक्तीच बदनामी करण्यासाठी ‘तो’ व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करण्यात आला आहे. यावर आमची लिगल टीम तपासणी करत असून गरज पडल्यास न्यायालयातही जाण्याची आमची तयारी असल्याची प्रतिक्रीया कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. मुंबई जाण्यासाठी निघाले असताना नागपूर विमानतळावर पत्रकारांशी ते संवाद साधत होते.

Team Global News Marathi: