चीन घुसखोरीच्या मुद्द्यावरून राहुल गांधी यांनी साधला पंतप्रधान मोदींवर निशाणा

 

नवी दिल्ली | पुन्हा एकदा चीन घुसखोरीच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. चीन, पाकिस्तान आणि मिस्टर ५६ ची बेरीज म्हणजे हिंदुस्थानच्या भूमीवरील वाढती चीनची घुसखोरी, असे ट्विट राहुल यांनी रविवारी केले. लडाख आणि उत्तराखंडमधील चीनच्या घुसखोरीवरून त्यांनी केंद्रातील मोदी सरकारवर तोफ डागली आहे.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकांदरम्यान काढलेल्या प्रचारसभांत राहुल गांधींनी ’56 इंचाची छाती’ अशी टिप्पणी करीत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघाती टीका केली होती. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीचे जवळपास 100 सैनिक 30 ऑगस्टला उत्तराखंडच्या बाराहोटी सेक्टरमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (एलएसी) ओलांडून देशात घुसले होते.

आता या घुसखोरीच्या मुद्यावरून राहुल गांधींनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पेंद्र सरकारवर ट्विटरच्या माध्यमातून जोरदार हल्ला चढवला. ट्विट करताना लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी लडाखमध्ये चीनी सैनिक तैनात असल्याबद्दल केलेल्या विधानाची बातमीदेखील त्यांनी शेअर केली आहे. आता राहुल गांधी यांनी [अंतप्रधान मोदी यांच्यावर केलेल्या टीकेला भाजपा काय प्रतिउत्तर देते हे पाहावे लागणार आहे.

Team Global News Marathi: