शेतकरी आणि बाजारपेठ यांच्यात सांगड घालणार – मुख्यमंत्री

शेतकरी आणि बाजारपेठ यांच्यात सांगड घालणार – मुख्यमंत्री

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज फेसबुकच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाध साधला होता. यावेळी त्यांनी केंद्राने पारित केलेल्या शेतकरी विधेयकावर भाष्य केले आहे. जे विकेल तेच पिकेल ही योजना शासनाने राबविण्यास सुरुवात केली असून त्यादृष्टीने शेतकऱ्यांमध्ये जनजागृती सुरु केली असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, हमीभाव नाही तर पिकांना हमखास भाव मिळेल यादृष्टीने शेतकरी आणि बाजारपेठ यामध्ये सांगड घातली जाणार आहे. शासनाने महाओनियन चे सहा प्रकल्प राज्यात सुरु केले. केवळ कांद्यांसाठीच नाही तर कापूस, तूर, मुग,  अशा विविध शेतपिकांसाठी साठवणूकीची, कोल्ड स्टोअरेजची व्यवस्था शासन उभी करत आहे.

केंद्र सरकारने जो कृषी कायदा आणला आहे त्याबाबत सर्व संबंधितांशी, शेतकरी संघटनांशी शासन संवाद साधत असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. ते म्हणाले की, कृषी कायद्याचे फायदे आणि तोटे विचारात घेऊन राज्यातील शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: