कोरोना संकट कमी होत असले तरी निर्बंध आणखी काही काळ राहणार -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राज्यातील निर्बंध १५ जूनपर्यंत कायम ठेवणार असल्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

कोरोना संकट कमी होत असले तरी निर्बंध आणखी काही काळ राहणार -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : कोरोना महामारीची दुसरी लाट (second wave of corona) ओसरताना दिसत आहे. मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्येत घट होत असून राज्यातील लॉकडाऊन (Lockdown) हटणार का असा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान याच पाया11ठिकाणी ठिकाणी ठठुण्यबुउउभपंर्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) राज्यातील जनतेशी संवाद साधला आणि लॉकडाऊन (Lockdown) आणि इतर मुद्द्यांबाबत माहिती दिली. महाराष्ट्रात (Maharashtra) कडक लॉकडाऊन लागू जरी लागू होणार नसला तरी निर्बंध (Corona restrictions) मात्र लागू राहणार आहेत, असे यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. (CM Uddhav Thackeray Live)

रुग्णसंख्या कमी होत असली तरी परिस्थिती गंभीरच

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेची संवाद साधताना आगामी काळात राज्य सरकारचे धोरण काय असणार हे स्पष्ट केले. मुख्यमंत्री ठाकरे कोणत्या नव्या घोषणा करतात याकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागलेले होते. कोरोनाच्या रुग्णांची संख्या सध्या जरी कमी होताना दिसत असली तरी पहिल्या लाटेशी तुलना करता ती अद्यापही जास्तच आहे. विशेषत: ग्रामीण भागातील  रुग्णांची संख्या वाढताना दिसते आहे. त्यामुळे कोरोना संसर्ग कमी होणे गरजेचे आहे. राज्यात कडक लॉकडाऊन लागू केला जाणार नाही मात्र कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठीचे निर्बंध कायम राहणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेची संवाद साधताना केली आहे.

कडक लॉकडाऊन नसला तरी निर्बंध कायमच

मागील दोन महिन्यांच्या तुलनेत कोरोनाच्या रुग्णांची संख्या तुलनेने कमी होताना दिसत असली तरी अद्याप रुग्णसंख्या म्हणावी तितकी कमी झालेली नाही. मागील काही आठवड्यांच्या तुलनेत रुग्णसंख्या कमी असली असली मागील वर्षीच्या आकडेवारीशी तुलना करता अजूनही परिस्थिती गंभीरच आहे. मागील वर्षी असलेल्या सर्वोच्च रुग्णसंख्येजवळ आपण पोचत आहोत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत विषाणूचे संक्रमण जास्त वेगाने होते आहे. त्यामुळे राज्यात कडक लॉकडाऊन जरी लागू करण्यात येणार नसला तरी कोरोना संक्रमणाला आळा घालण्यासाठी निर्बंध मात्र कायमच राहणार आहेत. राज्याच्या काही भागात अद्यापही कोरोना संक्रमण वाढतेच आहे, असे यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

विविध योजनांद्वारे गरजूंना मदत

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अन्न सुरक्षा योजनेद्वारे महाराष्ट्र सरकारने आतापर्यत २,७४,००० मेट्रिक टन धान्याचे मोफत वाटप गरजूंना केले आहे. बांधकाम क्षेत्रातील कामगारांना १५५ कोटी रुपयांची मदतदेखील करण्यात आली आहे. याशिवाय संजय गांधी निराधार योजना, दिव्यांग निवृत्ती, विधवा निवृत्ती वेतन योजनेद्वारे ८५० कोटी रुपये लाभार्थ्यांच्या खात्यात आतापर्यत जमा झाले आहेत. तर शिवभोजन योजनेअंतर्गदेखाल ५५ लाख थाळ्यांचे मोफत वितरण करण्यात आले आहे. फेरीवाल्यांसाठीदेखील ५२ कोटी रुपयांची मदत करण्यात आली आहे, असे यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

महाराष्ट्र १२ कोटी लस एकरकमी घेण्याच्या तयारीत

मागील वर्षी कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेत ज्येष्ठ नागरिक यांना कोरोनाची बाधा अधिक झाली तर दुसऱ्या लाटेत युवा आणि मध्यमवयीन लोकांना कोरोनाची अधिक लागण झाली. याच पद्धतीने पुढील लाटेत बालकांना मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण होण्याची शक्यता काही लोक व्यक्त करत आहेत. यासाठी राज्यातील बालकांना सुरक्षित ठेवले पाहिजे. राज्यामध्ये ४५ वयोगटावरील नागरिकांच्या लसीकरणाची जबाबदारी केंद्र सरकारने घेतली आहे. तर १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांची जबाबदारी राज्य सरकारची आहे आणि त्यासाठी महाराष्ट्र समर्थ आहे. राज्य सरकारची १२ कोटी लस एकरकमी घेण्याची तयारी आहे. राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण थोडेसे स्थगित जरी करावे लागले असले तरी लवकरच राज्य सरकार ते जोमाने सुरू करणार आहे असे यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: