मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी कुटूंबियांसमवेत श्री गणेशाची प्रतिष्ठापना केली


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी कुटूंबियांसमवेत श्री गणेशाची प्रतिष्ठापना केली

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला श्री गणेश आगमनाच्या शुभेच्छा दिल्या 

मुंबई : आज श्री गणेश चतुर्थी… सर्वत्र लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन होत असून गणेशोत्सवाचा  उत्साह पहायला मिळत आहे. सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच राजकीय नेत्यांच्या घरीही गणरायाचे आगमन झाले आहे.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर श्री गणरायाचे आगमन झाले आहे. यंदा गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे सर्वत्र गणेशोत्सव साधेपणाने साजरा केला जात आहे. 

https://twitter.com/CMOMaharashtra/status/1297082728005869569?s=19

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर गणपती बाप्पाचे आगमन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी कुटूंबियांसमवेत श्री गणेशाची प्रतिष्ठापना केली. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या सुविद्य पत्नी सौ. रश्मी ठाकरे, पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे उपस्थित होते.

ग्लोबल न्युज नेटवर्क: