मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून शिरोळमधील पुरबाधित ठिकाणांची पाहणी

 

कोल्हापूर | कोल्हापुर जिल्ह्यातील पुरबाधित ठिकाणांची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सकाळी १० वाजण्याच्या दरम्यान कोल्हापूर विमानतळावर दाखल झाले. आज दिवसभरात ते कोल्हापूर, सांगलीतील पुरस्थितीची पाहणी करून नुकसानीचा आढावा घेणार आहेत.

मुख्यमंत्री ठाकरे हे विमानतळावरून थेट शिरोळमध्ये दाखल झाले आहेत. त्यांनी शिरोळमधील पुरबाधित ठिकाणांची पाहणी सुरू केली आहे. शिरोळमधील पाहणीनंतर ते दुपारी कोल्हापुरातील शाहूपुरी कुंभार गल्ली, शिवाजी पूल या ठिकाणी भेट देतील.

या दौऱ्यात पालकमंत्री सतेज पाटील, ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ, राज्य आरोग्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, शिवसेनेचे नेते त्यांच्या सोबत उपस्थित आहेत.

Team Global News Marathi: