मुख्यमंत्र्यांनी हातात कागद न घेता ३० मिनिटे अर्थसंकल्पावर भाष्य करावे – निलेश राणे

मुख्यमंत्र्यांनी हातात कागद न घेता ३० मिनिटे अर्थसंकल्पावर भाष्य करावे – निलेश राणे

अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आज संसदेत २०२१-२२ या वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला. यावर महाविकास आघाडीच्या अनेक बड्या नेत्यांनी जोरदार टीका केली होती. तर याच अर्थसंकल्पाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा भाजपा नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.

भाजप नेते निलेश राणे यांनी अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे. तर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कागद न घेता अर्थसंकल्पावर ३० मिनिटे बोलून दाखवावे असे निलेश राणे यांनी ट्विटच्या माद्यमातून म्हंटले आहेत.

‘देशाचा बजेट आज जाहीर झाला, मागचं वर्ष संकटात गेलं तरी यंदाचा अर्थसंकल्प धाडसी आहे… अर्थव्यवस्थेला चालना देणारा आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन हातात कागद न घेता अर्थसंकल्प विषयावर ३० मिनिट बोललं पाहिजे.’ असं खुलं आव्हान राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलं आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: