राज्यपाल भगतसिंह कोश्यारी होऊ शकतात उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री ?

मुंबई : सतत वादाच्या भोवऱ्यात सापडलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची लवकरच मुख्यमंत्री पदावर वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उत्तराखंडमध्ये सध्या भाजपाची सत्ता असून सध्याचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत यांच्याविरूद्ध भाजप आमदारांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण असल्यामुळे उत्तराखंडमध्ये नव्या मुख्यमंत्र्याची घोषणा होऊ शकते असे चित्र सध्यातरी दिसत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार उत्तराखंड मधील अनेक आमदार आणि मंत्री दिल्लीत तळ ठोकून बसले आहे. तसेच उत्तराखंडचे मुख्यमंत्री देखील दिल्ली दौऱ्यावर आहेत. रावत यांना राजीनामा देण्यास सांगितले असल्याची माहिती समोर येत आहे. परंतू आणखी याबद्दल अधिकृत घोषणा झाली नाही.

तर दुसरीकडे पक्ष नेतृत्वाने दोन दिवसांपूर्वी रमणसिंग आणि दुष्यंत गौतम यांना उत्तराखंडच्या दौऱ्यावर पाठवले होते. ४५ आमदारांशी त्यांनी चर्चा केल्याचे वृत्त आहे. त्यानंतर त्यांनी आपला अहवाल राष्ट्रीय कार्यकारणीकडे दिला. त्यानंतर आज अमित शहा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतील, अशी माहिती आहे. दरम्यान, भगतसिंग कोश्यारी यांना या सर्व घडामोडीत मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळण्याची जबाबदारी देण्यात येऊ शकते.

Team Global News Marathi: