छत्रपती उदयनराजे भोसले यांना पाहताच गाडीतून उतरून मंत्री शंभूराज देसाई यांनी मुजरा

छत्रपती खासदार उदयनराजे भोसले आणि गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या मैत्रीचे किस्से संपूर्ण सातारा जिल्हयात प्रसिद्ध आहेत. हे दोन्ही नेते जरी वेगवेगळ्या पक्षात असले तरी यांची मैत्री संपूर्ण सातारा जिल्ह्याला परिचय आहे. त्यात खासदार उदयनराजे भोसले आणि गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांच्याही मैत्रीचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई एका लग्न समारंभासाठी कोल्हापूरला जात होते, विशेष म्हणजे त्याच वेळी योगायोगाने खासदार उदयनराजे भोसले हेदेखील गोव्याच्या दिशेने निघाले होते. पुढे देसाई यांच्या गाडीचा ताफा दिसल्यानंतर उदयनराजेंनी कोल्हापूर नजदिक शिरोळ MIDC येथे त्यांच्या ताफ्याबरोबर आपली गाडी गेली. राजेंची गाडी दिसताच शंभूराजेंनी गाडीतून उतरून त्यांना मुजरा केला होता.

त्यात हा क्षण बरोबर असलेल्यांनी आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपला होता. सध्या हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड वायरल होत आहे. राजेंबद्दल काहीही कोणी बोललं तर शंभूराजे सातारकर म्हणून ते खपवून घेत नाहीत. साताऱ्याच्या गादीचा मान ठेवलाच पाहिजे, सातारकर म्हणून आम्हाला त्यांचा अभिमान आहे, असंही गेल्या काही दिवसांपूर्वी शंभुराज देसाई म्हणाले होते.

 

Team Global News Marathi: