मोठी बातमी | महाराष्ट्र सदन भ्रष्टाचाराच्या आरोपातून छगन भुजबळ यांची निर्दोष सुटका

 

मुंबई | मागच्या अनेक वर्षांपासून गाजत असलेल्या महाराष्ट्र सदन घोटाळ्या प्रकरणी कोर्टाने महत्वपूर्ण निकाल दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना सर्वात मोठा दिलासा मिळाला आहे. छगन भुजबळ यांना दिल्लीतील कथित महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात क्लीन चीट मिळाली आहे. या प्रकरणात छगन भुजबळ यांना जेलची हवा सुद्धा खावी लागली होती. याच मुद्द्यावरून विरोधकांनी राष्ट्रवादीला घेरण्याचा प्रयत्न सुद्धा केला होता.

समोर आलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणाच्या आरोपातून छगन भुजबळ मुक्त झाले आहेत. या प्रकरणातून छगन भुजबळांचं नाव वगळण्यात आलं आहे. मुंबईतील सत्र न्यायालयाने आज हा सर्वात मोठा निर्णय दिला. छगन भुजबळ यांना महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात दोन वर्षांची जेलवारी झाली होती. या प्रकरणात छगन भुजबळ यांच्याकडून आपलं नाव गुन्ह्यातून वगळावं अशी याचिका सत्र न्यायलयात दाखल करण्यात आली होती.

मंत्री छगन भुजबळ यांच्या या याचिकेवर मुंबई सत्र न्यायालयाने आज मोठा निर्णय देत, छगन भुजबळांना मुक्त केलं. या प्रकरणात यापूर्वी ५ जणांना दोषमुक्तता करण्यात आलं आहे. तेव्हा ACB ने बेजबाबदारपणे गुन्हा नोंदवल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. विकासक चमणकर कुटुंबियांतील चौघांसह एका पीडब्ल्यूडी अभियंत्याचा यामध्ये समावेश होता. मात्र आज छगन भुजबळांचं नावही या प्रकरणातून वगळण्यात आलं आहे.

Team Global News Marathi: