Chandrayaan-2 इस्त्रोच्या ट्वीटमुळे ‘विक्रम’चं गूढ आणखी वाढलं, वाचा सविस्तर बातमी

हिंदुस्थानची अंतराळ संशोधन संस्था इस्त्रो (Indian Space Research Organisation – ISRO) चंद्राच्या पृष्ठभागावर पडलेल्या विक्रम लँडरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे. याच दरम्यान मंगळवारी इस्त्रोने एक ट्वीट केले आहे. आमच्या पाठिशी ठामपणे उभे राहिल्याबद्दल हिंदुस्थानमधील जनतेचे आभार, असे या ट्वीटमध्ये इस्त्रोने म्हटले आहे. विक्रमची संपर्क साधण्यासाठी शेवटचे चार दिवस बाकी असतानाच इस्त्रोने केलेल्या एका ट्वीटमुळे गूढ वाढलं आहे.

हिंदुस्थानचे महत्त्वाकांक्षी योजनांपैकी एका असणाऱ्या चांद्रयान-2 मोहीमेतील विक्रम लँडर 7 सप्टेंबरला चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार होते. परंतु चंद्राच्या पृष्ठभागापासून 2.1 किलोमीटर अंतरावर असताना त्याचा संपर्क तुटला आणि ते भरकटले. तेव्हापासून 10 दिवस उलटून गेले तरी विक्रमशी संपर्क होऊ शकलेला नाही.

मंगळवारी नासाचे ऑर्बिटर विक्रम लँडिंग साईटवरून गेले. नासाकडून काही माहिती मिळेत अशी आशा होती, परंतु अद्याप कोणतीही घोषणा नासा किंवा इस्त्रोकडून करण्यात आलेली नाही. याच दरम्यान इस्त्रोने सायंकाळी 6.44 वाजता एक ट्वीट केले.

‘आमच्यासोबत ठामपणे उभे राहिल्याबद्दल धन्यवाद. जगभरातील हिंदुस्थानी लोकांचे आशा, आकांशा आणि स्वप्नांपासून प्रेरणा घेऊन आम्ही पुढे वाटचाल करत राहू’, असे ट्वीट इस्त्रोने केले आहे. इस्त्रोच्या या ट्वीटचे अनेक अर्थ लोक लावत आहेत. परंतु या ट्वीटमागील खरा अर्थ नक्की काय आहे हे इस्त्रो ही संस्थाच लवकर स्पष्ट करेन.

नासाला नक्की काय दिसलं?
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पडलेला लँडर विक्रम आणि रोव्हर प्रज्ञान यांच्याशी संपर्क करण्याचे इस्त्रोसह (Indian Space Research Organisation – ISRO) अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ (NASA) प्रयत्न करत आहे. नासाचे लूनर रिकॉनसेंस ऑर्बिटर (LRO) विक्रमच्या लँडिंग साईटवरून मंगळवारी गेले. त्यामुळे संपर्काच्या आशा वाढल्या, परंतु नासाकडून अद्याप कोणताही घोषणा करण्यात आलेली नाही. तसेच विक्रमचे फोटोही नासाचे ऑर्बिटर घेणार होते, मात्र हे फोटोही प्रसिद्ध करण्यात आलेले नाही.

=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठी चे फेसबुक पेज व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा.
@ग्लोबल मीडिया सोल्युशन्स.

ग्लोबल न्युज नेटवर्क: