पुण्यातील व्यापारी वर्गाच्या आंदोलनाला चंद्रकांत पाटलांचा पाठिंबा, स्वतः आंदोलनात सामील होण्याचे केले जाहीर !

 

पुणे | सध्या कोरोनाच्या परिस्थितीमुळे मागच्या अनेक महिन्यांपासून वयापारी वर्गावर दडपण आणुन त्यांना जबरदस्तीने दुकाने बंद करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. मात्र आज रूग्णसंख्या सातत्याने कमी झालेली असतानाही सरकारने व्यवसायांच्या वेळांमध्ये कोणताही बदल केला नाही़.

आज कुरणा संसर्ग आटोक्यात येत असताना सुद्धा झोपचे सोंग घेतलेल्या सरकारला जागे करण्यासाठी व व्यापारी वर्गाला योग्य न्याय मिळावा, याकरिता पुण्यातील व्यापाऱ्यांकडून विविध ठिकाणी येत्या ३ ऑगस्टला दुपारी घंटानाद आंदोलन करण्यात येणार आहे.

दरम्यान यानंतरही राज्य सरकार जागे झाले नाही व दुकानांच्या वेळा वाढवल्या नाहीत. तर बुधवार ४ ऑगस्टपासून पुणे शहरातील सर्व दुकाने ७ वाजेपर्यंत उघडी ठेवण्यात येतील. यावेळी आम्हाला अटक करून आमच्यावर कारवाई झाली. तरी आम्ही त्यास सामोरे जाण्यास तयार असल्याची भूमिका शहरातील व्यापाऱ्यांनी घेतली आहे. या भूमिकेला चंद्रकांत पाटलांच्या वतीने पाठिंबा दर्शवण्यात आला आहे.

पाटील म्हणाले, ”भाजप पक्ष हा आंदोलनजीवी नाही. परंतु सध्याच्या पुण्यातील कडक निर्बंधामुळे व्यापारी वर्गाच मोठ्या प्रमाणवर नुकसान होत आहे. पुण्यातल्या व्यापाऱ्यांकडून सातत्याने वेळ वाढवण्याची मागणी होतानाचे चित्र आहे. त्याच पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांनी वेळ वाढवण्याबाबत दोन दिवसाची मुदत पण दिली आहे. त्याची राज्य सरकारने दाखल घेतली नाही. तर व्यापारी बुधवारी घंटानाद आंदोलन करणार आहेत. माझा आणि पक्षाचा या आंदोलनाला पाठिंबा असून मी स्वतः त्याचे नेतृत्व करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले आहे.

Team Global News Marathi: