चंद्रकांत पाटील लिहिणार अमित शहांना पत्र, हा तर सरहकार मोडण्याचा डाव – उदय सामंत

 

जरंडेश्वर कारखाना हे हिमनगाचं टोक आहे. त्यामुळे सर्वच ५४ साखर कारखान्यांची चौकशी झाली पाहिजे. त्यासाठी मी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्रं लिहून तशी मागणी करणार आहे अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली होती.

आता चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानाचा उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. गृहमंत्री अमित शहा यांना लिहिलेले पत्र चंद्रकांत पाटील यांचं वैयक्तिक पत्र आहे. सहकार क्षेत्र मोडीत काढण्याचा हा डाव आहे. त्यातलाच हा एक भाग असल्याचं मत उदय सामंत यांनी नोंदवलं आहे.

पुढे अनिल देशमुख यांच्या संदर्भात बोलताना सामंत म्हणाले की, अनिल देशमुख हे दिल्ली का गेले याची मला माहिती नाही. पण, ईडीच्या चौकशीला सामोरे जाण्यासाठी आणि उत्तर देण्यासाठी अनिल देशमुख सक्षम आहेत. या कारवाई मागची भावना जनतेला माहिती आहे. जनतेपर्यत ती पोहचली आहे, अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली आहे.

Team Global News Marathi: