चंद्रकांत पाटील यांनी अचानक घेतली राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट; उलट सुलट चर्चाना उत

मुंबई : महाविकास आघाडीने राज्यपाल नियुक्त आमदार करण्यासाठी यादी देताच आज अचानक भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीमुळे अनेक राजकीय तर्क वितर्कांना उधाण आलं आहे. कालच आज घेतलेली ही भेट नेमकी कोणत्या विषयावर होती? हे अद्याप गुलदस्त्यात आहे. या भेटीवर राजकीय तज्ज्ञांमध्ये उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

चंद्रकांत पाटील यांनी आज दुपारी राज्यपालांची अचानक भेट घेतली. या त्यांच्या भेटीचा कार्यक्रम नियोजित नव्हता. त्यामुळे नेमकी भेट कशासाठी होती, याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. मागील दोन दिवसांपासून रिपब्लिकन टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना केलेल्या अटकेच्या नंतर भाजपाकडून राज्यभरात तीव्र आंदोलन छेडण्यात आली. त्याच पार्श्वभूमीवर आज झालेल्या न्यायालयातील सुनावणीनंतर अर्णव यांना फार मोठा दिलासा मिळाला नाही.

यामुळे एकूणच प्रकरणात राज्यपालांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांच्याकडून राज्यपालांकडे करण्यात आली असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे सोमवारपासून राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेती पिकाच्या आणि इतर नुकसानी संदर्भातील मदत देण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होत आहे. मात्र, अद्यापही या मदती संदर्भात प्रशासकीय पातळीवर प्रचंड मोठा गोंधळ आहे.

गाफील न राहता युरोपप्रमाणे दुसऱ्या लाटेचा मुकाबला करण्याची तयारी राहू द्या-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

तर दुसरीकडे शिक्षक-पदवीधरांच्या निवडणुकीची आचारसंहिता राज्यात सुरू असल्याने ही मदत देण्यासाठी अडचणी उभ्या राहिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ही चंद्रकांत पाटील यांनी राज्यपाल सोबत चर्चा केली असल्याचे सांगितले जाते.

ग्लोबल न्युज नेटवर्क: