चंद्रकांत पाटील म्हणाले “पाठीत खंजीर खुपसले” आता संजय राऊत म्हणतात की,

 

मुंबई | राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून सेना-भाजपा यांचा वाद होत असल्याचे अनेकवेळा दिसून आले होते. त्यातच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पाठीत खंजीर खुपसल्याबाबत केलेल्या टीकेला, शिवसेना शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे.

राऊत म्हणाले की, शिवसेनचा इतिहास सर्वांना माहीत आहे, शिवसैनिक कधीही पाठीत खंजीर खुपसण्याचं काम करत नाही. असे प्रकार बाळासाहेबांपासून ते उद्धव ठाकरेपर्यंत कोणी केले नाहीत, असं संजय राऊत म्हणाले. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. तसेच यावेळी राऊत यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या विधानाचा खरपूस समाचार घेतला होता.

संजय राऊत म्हणाले, “चंद्रकांत पाटील यांच्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे. महाराष्ट्रापुढे खूप मोठी कामे आहेत. देशात पहिल्या पाचमध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे नाव येत आहे, हे विरोधी पक्षातील नेत्यांचे दुःख मी समजू शकतो. शिवसेनचा इतिहास सर्वांना माहीत आहे.

शिवसैनिक कधीही पाठीत खंजीर खुपसण्याचं काम करत नाही. असे प्रकार बाळासाहेबांपासून ते उद्धव ठाकरेपर्यंत कोणी केले नाहीत. बंद दाराआड काय झालं होतं आणि तिथून शब्द कसे फिरवले गेले या चर्चेत आता आम्ही जात नाही, महाराष्ट्रातलं वातावरण आता वेगळे आहे आणि या जनतेला मदतीची गरज आहे” असे त्यांनी बोलून दाखविले होते.

Team Global News Marathi: