चंद्रकांत पाटील यांनी पुनः पवारांना डिवचले म्हणाले ‘बारामती काय कोणाच्या बापाची पेंड नाही’

चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा काढला बाप, म्हणाले ‘बारामती काय कोणाच्या बापाची पेंड नाही’

ग्लोबल न्यूज – भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी पुण्यात बोलताना “आम्ही तुमचे बाप आहोत, हे लक्षात ठेवा” असे म्हणत चक्क अजित पवार यांनाच सुनावले होते. काल त्यांनी पुन्हा एकदा “बारामती काय कोणाच्या बापाची पेंड नाही” असे म्हणत पवार यांचे नाव न घेता टीका केली. ते दौंड तालुक्यातील चौफुला याठिकाणी बोलत होते.

कृषी कायद्याचे स्वागत करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने वरवंड ते चौफुला या मार्गावर ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत परिसरातील 100 पेक्षा जास्त ट्रॅक्‍टर सहभागी झाले होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले, बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीने मार्केट कमिटी च्या बाहेर विकल्या जाणाऱ्या शेतमालाचा सेस गोळा करण्याचा फतवा काढला आहे. बारामती काय कुणाच्या बापाची पेंड आहे का? केंद्राने केलेल्या कायद्याला स्थगिती देता येत नाही.

भाजपने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले असून या कायद्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती होणार आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शिवार सभा व घोंगडी सभा घेऊन शेतकऱ्यांना या कायद्याचे महत्त्व पटवून देणार आहे. राज्य सरकारने कृषी विधेयकाला अशाप्रकारे स्थगिती देणे चुकीचे आहे. त्याविरोधात आम्ही उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत.

ग्लोबल न्युज नेटवर्क: