केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना कोरोनाची लागण

ग्लोबल न्यूज – पर्यावरण, वन तसेच केंद्रीय सूचना व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. जावडेकर यांनी ट्वीट करत आपली कोविड चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे सांगितले आहे.

प्रकाश जावडेकर यांनी असे ट्वीट केले आहे की, ‘आज माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मागील दोन-तीन दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी आपली चाचणी करुन घ्यावी.’ असे आवाहन प्रकाश जावडेकर यांनी केले आहे.

भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर होत आहे. मागील दोन दिवसांपासून देशात दररोज दोन लाखांहून अधिक कोरोना बाधित रुग्णांची नोंद होत आहे. तसेच, दररोज होणाऱ्या मृतांची संख्या देखील एक हजाराहून अधिक झाली आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: