कॅन्सल बटण दोनदा दाबल्यास एटीएम पिन सुरक्षित?

 

तुम्ही एटीएममधून पैसे काढत असाल तर दोन वेळा कॅन्सल बटण दाबलं तर पिन चोरी होत नाही असा दावा करण्यात आलाय. पण हा दावा खरा आहे का ? दावा खरा असेल तर अनेकांना याचा फायदा होईल. या दाव्याची पडताळणी करण्यात आली.दावा आहे की, तुम्ही एटीएममधून पैसे काढत असाल तर त्याआधी कॅन्सल बटण दोन वेळा दाबा. त्यामुळे तुमचा पिन नंबर कुणीही चोरणार नाही. हा दावा केल्यानं अनेकजण हा प्रयोग करून पाहतायत. पण, पिन सुरक्षित राहतो का याबद्दल काहीच कळत नाही. त्यामुळे आम्ही या दाव्याची पोलखोल करण्यासाठी आम्ही पडताळणी सुरू केली. पण, व्हायरल मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात.

एटीएममधून पैसे काढताना एक अतिशय उपयुक्त टीप म्हणजे एटीएम मशिनमध्ये कार्ड टाकण्यापूर्वी कॅन्सल बटण दोनदा दाबा. एखाद्याने तुमचा पिन कोड चोरण्यासाठी कीपॅड सेट केला असल्यास तो सेटअप रद्द होईल. हा मेसेज व्हायरल झाल्याने आम्ही याबाबत बँकेकडून अधिक माहिती मिळवली. आरबीआयने असा मेसेज जारी केलाय का? याची माहिती मिळवली. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात.

कॅन्सल बटण दोनदा दाबल्यास पिन सुरक्षित राहतो हा दावा खोटा आहे. आरबीआयने कोणताही मेसेज जारी केलेला नाही. तुमचा एटीएम पिन नंबर कुणालाही देऊ नका. आजच्या काळात 99 टक्के लोक पैशांच्या व्यवहारासाठी एटीएमचा वापर करतात. परंतु काही वेळा एटीएम काळजीपूर्वक न वापरल्याने ग्राहकाला नुकसान सहन करावे लागते. त्यामुळे पैसे काढताना कार्ड रिडरला कोणती वस्तू लावली नाहीये ना हे तपासून पाहा. आमच्या पडताळणीत कॅन्सल बटण दोनदा दाबल्याने ATM पिन सुरक्षित असतो हा दावा असत्य ठरला

Team Global News Marathi: