जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सामान्य नागरिकांसाठी सुरु होऊ शकते लोकल सेवा ?

जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सामान्य नागरिकांसाठी सुरु होऊ शकते लोकल सेवा ?

कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर सामान्य नागरिकांसाठी लोकलची दारे बंद करण्यात आली होती. फक्त अत्यावश्यक सेवेसाठी बाहेर पडणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा थोडयाफार प्रमाणात सुरु करण्यात आली होती. त्यानंतर महिला कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरु करण्यात आली होती. त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांसाठी लोकल सेवा केव्हा सुरु होणार असा प्रश्न सर्व सामान्य नागरिकांना पडला होता.

मात्र आता लवकरच सर्वांसाठी लोकल सेवा सुरु होणार असे संकेत महाविकास आघाडीमध्ये मंत्री असलेल्या विजय वड्डेवार यांनी दिले आहे. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मुंबईची लोकल ट्रेन सेवा सरसकट सगळ्यांसाठी सुरु करण्याबाबत सकारात्मक आहेत. जानेवारीच्या पहिल्या आठ दिवसांमध्ये लोकल सेवा सरसकट सगळ्यांसाठी सुरु करण्यात यावी असा विचार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करत आहेत. ”

ऑक्टोबर महिन्यात जेव्हा मुंबई लोकल महिलांसाठी सुरु करण्यात आली तेव्हा लोकल सरसकट सगळ्यांसाठी कधी सुरु होणार हा प्रश्न विचारला जात होता. लोकल सगळ्यांसाठी सुरु करण्याबाबत राज्य सरकारने रेल्वे मंत्रालयाला पत्रंही पाठवली होती. मात्र त्यावर काही उत्तर आलं नाही. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सुरु करण्यासाठी सकारात्मक आहेत असं समजतं आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: