परंतु न्यायालयात प्रलंबित मराठा आरक्षणाच काय..? विनोद पाटलांचा सवाल

न्यायालयातून सरकार आलं, न्यायालयातून सरकार जाईल..
परंतु न्यायालयात प्रलंबित मराठा आरक्षणाच काय..?

औरंगाबाद: देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार यांनी पहाटेचा शपथविधी करून सरकार स्थापन केले. या सरकारला सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा हस्तक्षेप केला व खुले मतदान घेण्याचा आदेश दिला. परिणामी तीन दिवसात सरकार कोसळलं.. आणि न्यायालयाच्या आदेशाचा फायदा महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यासाठी झाला. विद्यमान सरकार न्यायालयातून सरकार आलं, न्यायालयातून सरकार जाईल..परंतु न्यायालयात प्रलंबित मराठा आरक्षणाच काय..? असा सवाल मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी उपस्थित केला आहे.

आजही तसच होताना दिसतंय.. सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. ज्यामध्ये एकनाथ शिंदे साहेब यांच्या गटाला बजावण्यात आलेल्या अपात्रतेच्या नोटिसांना आणि अजय चौधरी साहेब यांच्या गटनेते नियुक्तीलाही आव्हान देण्यात
आलं आहे.

शिंदे यांचा दावा आहे की, उपाध्यक्ष (हंगामी अध्यक्ष) मला अपात्रतेची नोटीस देऊ शकत नाहीत. कारण मी गटनेता आहे, अजय चौधरी यांची निवड अयोग्य असून बहुमत आमच्याकडे आहे.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid0YyApYsoD9sLmbXLcuPG7gqmHMUDwjdLvUeByiViEocCjqpQeo3yi19UeZ3JgJhzl&id=100044574933191

यावर न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जे.बी. पारडीवाला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. शिंदे यांच्या बाजूने जेष्ठ विधीतज्ञ हरीश साळवे साहेब तर शिवसेनेच्या वतीने अभिषेक सिंघवी साहेब हे बाजू मांडणार आहेत.

शिंदे यांच्या नावावर गटनेते पदाबाबत शिक्कामोर्तब झालं तर व्हीप काढण्याचा अधिकार त्यांचा असेल. साहजिकच ते महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात असतील. परिणामी न्यायालयातून आलेलं सरकार न्यायलायातून जाईल..अस दिसतय.

….

पक्ष कुठलाही असो, सरकार व आपली खुर्ची वाचवण्यासाठी व मिळवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतात. प्राणपणाने कोर्टात सुद्धा लढा देतात.
मात्र हे करत असताना त्या अगोदर निवडून येण्यासाठी ज्यांची तुम्हाला मदत होते, त्या बहुसंख्य असलेल्या मराठा समाजाला विसरून जाता. विनोद पाटलांचा सवालज्या तळमळीने खुर्चीसाठी झटता त्याच्या अर्ध तरी मराठा आरक्षणासाठी न्यायालयात कष्ट कराल का?

यामध्ये एक मराठा लाख मराठा असणारे एकनाथ शिंदे साहेब विजयी झाले तर आनंदच आहे. साहेब तुम्ही विजयी व्हावेत व मराठा आरक्षणाचा तोडगा आपण काढावा यासाठी शुभेच्छा..

– विनोद पाटील.

ग्लोबल न्युज नेटवर्क: