‘भाई’ युनिव्हर्सिटीमध्ये मी गेलेलो नाही | छगन भुजबळांचा विरोधकांना टोला !

 

नाशिक | काही दिवसांपूर्वी एका जाहीर बैठकीत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि पालकमंत्री छगन भुजबळ आणि शिवसेना आमदार सुहास कांदे यांच्यामध्ये जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली होती. याच मुद्द्यावरून या वही नेत्यांमध्ये टोकाचा संघर्ष पेटलं होता. त्यातच कांदे यांनी छगन भुजबळ विरोधात केलेली तक्रार मागे घेण्यासाठी छोटा राजन टोळीचा फोन आल्याची माहिती कांदे यांनी दिली होती. यावर आता भुजबळ यांनी भाष्य केले आहे.

कांदे यांनी केलेले खोटे आरोप मला राजकारणात बदनाम करण्याचा कुटिल डाव असून, त्याची तक्रार मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली असून, चौकशीची मागणीही केली आहे. मी कधीही ‘भाई’ युनिव्हर्सिटीमध्ये गेलेलो नाही, असा टोलाही मंत्री छगन भुजबळ यांनी लगावला. तसेच पोलिसांनी तपास करीत फोन कॉलचे रेकाॅर्डिंग तपासावे. यामध्ये आमचा काहीही संबंध नाही. ‘भाई’ युनिव्हर्सिटीचे जे विद्यार्थी आहेत, त्यांच्यात काय चर्चा होते, हे मी सांगू शकत नाही, असा चिमटाही भुजबळ यांनी त्यांच्या खास शैलीत काढला.

भुजबळ म्हणाले, ज्या अशोक निकाळजे नावाचा कांदे यांनी तक्रार अर्जात उल्लेख केला आहे, त्यांनीच भुजबळ यांच्याशी आमची काहीही चर्चा झाली नसल्याचे सांगितल्याने प्रश्न मिटतो. उलट कांदे यांनीच ‘मी आमदार आहे, तुला शिकवितो असा दम दिला’ असा आरोपही निकाळजे यांनी केला आहे.

Team Global News Marathi: