Breaking बारावीच्या निकालाची तारीख अखेर ठऱली

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. उद्या (मंगळवारी, दि.03) दुपारी चार वाजता ऑनलाईन पद्धतीने निकाल जाहीर केला जाणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात याबाबत माहिती देण्यात आली आहे. कोरोनामुळे यंदा बारीवीची परीक्षा रद्द करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने देशभरातील सर्व मंडळांना बारावीचा निकाल 31 जुलैपर्यंत जाहीर करण्याचा आदेश दिला होता. मात्र राज्य मंडळाला ही मुदत पाळता आली नव्हती.

जुलैअखेर बारावीचा निकाल लागेल असे म्हटले गेले होते. अखेर प्रतिक्षा संपली असून उद्या (मंगळावरी, 03 ऑगस्ट) दुपारी चार वाजता हा निकाल जाहीर होत आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य शिक्षण मंडळांना या वर्षाच्या बारावीचे निकाल ३१ जुलै ३१ जुलै २०२१च्या आधी जाहीर करणे आवश्यक होते पण कोकण आणि कोल्हापुरातील पुराच्या परिस्थितीमुळे दोन दिवस उशिरा निकाल लागला. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिलेली ही अंतिम मुदत लक्षात घेऊन महाराष्ट्रातील यंदाच्या बारावीच्या निकालांचा तारीख (Maharashtra HSC Result 2021 Date) उद्या जाहीर होण्याची शक्यता आहे. (Maharashtra HSC Result 2021 Date: HSC results date announced tomorrow)

 

इथे पाहा निकाल

mahahsscboard.in

https://msbshse.co.in

https://hscresult.11thadmission.org.in

http://hscresult.mkcl.org

http://mahresult.nic.in

ग्लोबल न्युज नेटवर्क: