ई-रुपी : पंतप्रधान मोदींनी लॉन्च केलेल्या या कॅशलेस सेवेविषयी जाणून घ्या!

ई-रुपी : पंतप्रधान मोदींनी लॉन्च केलेल्या या कॅशलेस सेवेविषयी जाणून घ्या!

आता कॅशलेस व्यवहारासाठी इंटरनेट नसले तरी चालेल. तरीही ग्राहकांना कॅशलेस व्यवहार करणे शक्य होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाँच केलेला ई-रुपी ही नवी डिजिटल पेमेंट सेवेमुळे हे सारं शक्य होणार आहे. आज संध्याकाळी साडेचारच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कॅशलेस आणि कॉन्टॅक्टलेस व्यवहारांसाठी ई-रुपी इलेक्ट्रॉनिक व्हाऊचर बेस्ड पेमेंट सिस्टीम लॉन्च केली.


डिजिटल करन्सीच्या दृष्टीने भारताचं पहिलं पाऊल मानली जाणारी ई-रुपी ही सेवा आहे तरी कशी ते जाणून घेऊया…

काय आहे ई-रुपी?

ई-रुपी एक डिजीटल पेमेंट सुविधा आहे.

ई-रुपी ही एक कॅशलेस आणि कॉन्टॅक्टलेस पेमेंट सिस्टम आहे.

ई-रुपी क्युआर कोड किंवा एसएमएस स्ट्रिंगच्या माध्यमातून काम करणारे ई व्हाऊचर आहे.

या कार्डाचा वापर करुन डिजिटल पेमेंट आणि इंटरनेट बँकिंगसारखे व्यवहार करणे शक्य आहे.

ई-रुपी एक प्रकारे ऑनलाईन चेक असेल, जो एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला पाठवू शकेल.

ज्याला तो चेक वटवायचा आहे, तो मोबाईल क्रमांक आणि ओटीपी द्वारे ते पैसे आपल्या खात्यात घेऊ शकतो.

ई-रुपीचा वापर कुठे कुठे शक्य?

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं त्यांच्या युपीआय मंचावर, आर्थिक सेवाविभाग, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण यांच्या सहकार्यानं विकसित केलं आहे.

ई-रुपीचा वापर हा केंद्र सरकारच्या अनेक योजनांसाठी केला जाऊ शकतो.

ई-रुपी प्लॅटफॉर्म वापरकर्त्यांना कार्ड, डिजिटल पेमेंट अॅप्स किंवा इंटरनेट बँकिंग न घेता व्हाऊचर वटवण्याची परवानगी देईल.

मदर अँड चाईल्ड वेल्फेअर स्कीम, टीबी इरॅडिकेशन प्रोग्राम अंतर्गत देण्यात येणाऱी औषधे आणि पोषण आहार, तसेच आयुषमान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजना, आणि फर्टिलायझर सबसिडी योजनेमधील सुविधांसाठीही ई-रुपीचा वापर केला जाऊ शकतो.

यासोबतच, खासगी क्षेत्रातील कंपन्याही आपल्या कर्मचाऱ्यांना वेल्फेअर अँड कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी प्रोग्राम अंतर्गत ही डिजिटल व्हाऊचर्स देऊ शकतात; असं सरकारने स्पष्ट केलं आहे

ग्लोबल न्युज नेटवर्क: