सोलापूरचे ब्रॅण्डिंग ही चळवळ झाली पाहिजे! राजा माने

सोलापूरचे ब्रॅण्डिंग ही चळवळ झाली पाहिजे!
राजा माने यांचे प्रतिपादन

*सोलापूर-* सोलापूरचे ब्रँडिंग तर झालेच पाहिजे पण ती एक चळवळ झाली पाहिजे असे मत ज्येष्ठ पत्रकार राजा माने यांनी सोलापूर सोशल फाउंडेशन च्या सोलापूर ब्रँडिंग व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प गुंफताना व्यक्त केले.

श्री राजा माने यांनी सोलापूर शहर आणि जिल्ह्यात असलेल्या ब्रँडिंग करण्यायोग्य अशा अनेक गोष्टींची सविस्तर चर्चा केली. *डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी जगात फक्त तीन ठिकाणी आहेत.त्यातील सोलापूर एक ठिकाण.सोलापूर शहरातील स्वस्ताई हीसुद्धा सोलापूरचं मार्केटिंग करण्याची बाब होऊ शकते* असं ते म्हणाले.

सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरण हे केवळ शेतीसाठीच उपयोगाचे आहे असे नव्हे तर सर्वांगीण उन्नतीचे साधन आहे आणि उजनीच्या पाण्यावर केवळ सोलापूरचा नव्हे तर पुणे नगर याही जिल्ह्याचा कायापालट होणार आहे.
सध्या विडी उद्योगाविषयी बरीच निराशाजनक भाषा बोलली जाते परंतु या उद्योगात ज्या महिला बेकार होणार आहेत त्यांना पर्यायी उद्योग द्यायचा प्रयत्न झाला पाहिजे शिवाय सोलापुरात तयार होणारी विडी युरोप किंवा अमेरिकेत विकता येईल का याचाही विचार झाला पाहिजे असे ते म्हणाले.

श्री तुकाराम मुंढे जिल्हाधिकारी असताना त्यानी सोलापूर ते पंढरपूर रस्त्यावर 65 एकर जागेवर वारकऱ्यांसाठी तळ विकसित केला आहे त्यामुळे वारकऱ्यांच्या सोई मध्ये मोठी भर पडली आहे मात्र अशाच प्रकारचा शंभर एकरावर तळ सांगोला रस्त्यावर सुद्धा उभारता येतो मात्र त्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत असे श्री राजा माने यांनी प्रतिपादन केले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: