सीमाभाग महाराष्ट्राचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला ‘हा’ पुरावा
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभाग प्रश्न सध्या चांगलाच तापू लागलेला आहे. त्यात कर्नाटकाच्या मंत्र्यांनी महाराष्ट्र संदर्भात केलेल्या विधानाचे पडसाद आता महाराष्ट्रात उमटू लागले आहे. यावर आग मधील अनेक नेत्यांनी कर्नाटकी सरकारला चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. यावर आता मुख्यत्री उद्धव ठाकरे यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.
साठ वर्षांपूर्वी कारवारमधल्या एका शाळेत इंग्रजी, मराठी, कोंकणीतून अर्थ शिकविणारी शिक्षिका, एनसीसी बटालियनचा जुना मराठी नामफलक, कानडा जिल्ह्याचे ‘विचारी’ हे मराठीतील पहिले वृत्तपत्र, १९१२ चा कारवार अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचा मराठी वार्षिक अहवाल, बेळगावमधील १८९० मध्ये बांधलेल्या पुलाचा मराठीतला शीलाफलक अशा प्रकारे कर्नाटकातल्या सीमा भागामधले शंभर-सव्वाशे वर्षांपूर्वीपासूनच्या मराठी भाषेचे आणि संस्कृतीचे पुरावे राज्याच्या माहिती व जनसंपर्क संचालनालयाच्या माध्यामातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सादर केले आहे.
सध्याच्या सीमाभागातील वातावरणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र शासनाने ५० वर्षांपूर्वी तयार केलेला ‘अ केस फॉर जस्टीस’ हा ३५ मिनिटांचा अप्रतिम आणि संग्राह्य लघुपट सर्वांना बघण्यासाठी उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत.
पूर्वीच्या रिळांवर चित्रीकरण केलेल्या या चित्रपटाला माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने डिजिटल स्वरुपात पुनरुज्जीवित केल्याने इतका जुना दस्तऐवज आपण सहजपणे पाहू शकतो. हा लघुपट आपण माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या https://www.youtube.com/watch?v=y_3Pi36ia-c या यूट्यूब वाहिनीवर पाहू शकतो