बॉलिवूड बाहेर घेऊन जाण्यासाठी काही मुख्यमंत्री आले होते पण अजित पवारांनी नाव न घेता लगावला मुख्यमंत्री योगिनां टोला

 

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मागच्या दीड वर्षपासून अंबड असलेली नाट्यगुर्हा आणि सिनेमागृह आज पासून सुरु करण्यात आलेली आहे. मात्र कोरोना संसर्गाचे नियम पाळून प्रेक्षकांना प्रवेश देण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहे. याचं पार्श्वभूमीवर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बालगंधर्व रंगमंदीर येथे पहिली घंटा झाली आहे. यावेळी अजित पवार यांनी बोलताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर फिल्मसिटी उत्तरप्रदेशमध्ये हलवण्याच्या मुद्द्यावरून निशाणा साधला आहे.

अजित पवार म्हणाले की, मुंबईच्या फिल्मसिटीमध्येही अधिकच्या सुविधा पुरवण्याचे आमचे प्रयत्न आहेत. कारण काही लोकांची योजना होती की बॉलिवूड बाहेरच्या राज्यामध्ये घेऊन जायचे. त्यासाठी काही मुख्यमंत्रीही आले. मात्र चित्रपटसृष्टी मुंबईतच राहावी यासाठी महाविकास आघाडी सर्व प्रयत्न करेल, असं आश्वासन अजित पवारांनी दिलं आहे.

यापुढे ते म्हणाले, जेव्हापासून चित्रपटसृष्टीची सुरवात झाली तेव्हापासून संपूर्ण देशाचे केंद्र मुंबईच आहे. ते मुंबईच राहावं. हीच सगळ्यांची इच्छा आहे. त्यामुळे चित्रपटसृष्ठी मुंबईच्या बाहेर जाऊ देणार नाही, असं अजित पवार म्हणालेत. आता मुख्यमंत्री योगीवर केलेल्या टीकेवर भाजपा काय प्रतिक्रिया देते हे पाहावे लागणार आहे.

Team Global News Marathi: