दिवाळीत फटाके उडवण्यासंदर्भात बृहमुंबई महानगर पालिकेची नियमावली जाहीर

दिवाळीत फटाके उडवण्यासंदर्भात बृहमुंबई महानगर पालिकेची नियमावली जाहीर

रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला होता. प्रदूषणामुळे कोरोनाचा संसर्ग वाढतो. त्यामुळे प्रदूषण करणारे फटाके टाळा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला केले आहे. तसेच अनेक प्रश्नांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले होते.

मुख्यमंत्र्यांनी पूर्णपणे फटाक्यांवर बंदी घातलेली नसली तरी सर्वजनिक ठिकाणी फटाके न वाजवण्याचे आवाहन केले होते. कोरोनाचं संकट अजूनही कायम असून दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकत्र येऊन फटाके वाजवल्यास अधिक धोका वाढू शकतो. तसेच प्रदूषण वाढल्यास देखील कोरोना संसर्गाचा अधिक प्रसार होऊ पसरू शकतो. असे रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

यानंतर, आज बृहमुंबई महापालिकेने फटाके उडवण्यासंदर्भात नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार, मुंबईत लक्ष्मीपूजनाचा दिवस वगळता फटाक्यांवर बंदी घालण्यात आली आहे. तर, लक्ष्मीपूजनाला केवळ खासगी क्षेत्रात सौम्य फटाक्यांना परवानगी महापालिकेने दिली आहे. त्यामुळे फक्त लक्ष्मीपूजनाच्या देण्यात आलेली सूट ही अजब आहे. याच दिवशी कोरोना संसर्ग होणार नाही का? किंवा याच दिवशी प्रदूषण होणार नाही का? असे प्रश्न उभे राहिले आहेत

ग्लोबल न्युज नेटवर्क: