कळंब तालुका भाजपची गांधीगिरी;उपजिल्हा रुग्णालयातील 5 व्हेंटीलेटर्सची केली पूजा, व्हेंटीलेटर्स असून वापर नाही

कळंब तालुका भाजपाच्या वतीने उपजिल्हा रुग्णालयात 5 व्हेंटीलेटर्सची आज पूजा करत गांधीगिरी आंदोलन केले करून अनोख आंदोलन

अमर चौंदे

कळंब : जिल्ह्यात कोरोना ची परस्थिती ही दिवसेंदिवस प्रशासनच्या आवाक्या बाहेर जात आहे. ऑक्सिजन वेळेत न मिळाल्याने जिल्यात अनेक रुग्ण दगावले असताना देखील प्रशासन यातून काही बोध घेण्यास तयार नसल्याचे दिसत आहे.कळंब उपजिल्हा रुग्णालयात वापरा अभावी 5 व्हेंटिलेटर पडून असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे केवळ व्हेंटिलेटर सुरू नसल्याने सिरीयस रुग्ण देखील कळंब वरून उस्मानाबादला उपचारासाठी पाठवले जात आहेत.

जिल्ह्यातील कळंब उपजिल्हा रुग्णालयात पिएम केअर मधुन देण्यात आलेले व्हेंटीलेटर्स महाराष्ट्र शासनाच्या अनागोंदी कारभारामुळे धुळखात पडुन असल्याचा आरोप करत कळंब तालुका भाजपाच्या वतीने या व्हेंटीलेटर्सची आज पूजा करत गांधीगिरी आंदोलन केले करूण निषेध व्यक्त करण्यात आला.गेल्या पाच महीण्यापासुन देशासह राज्यात कोरोना च्या महामारीने हाहाकार माजवला असुन या जिवघेण्या विष्णाणूशी लढण्याकरीता पंतप्रधान नरेंद्र मोदीनीं प्रत्येक तालुका पातळीवरील रूग्णालयात व्हेंटीलेटर्स उपलब्ध करूण दिले आहे.

कळंब उपजिल्हा रुग्णालयात 5 व्हेंटीलेटर्स असुन देखील त्याला तंञज्ञ नसल्याने हे व्हेंटीलेटर्स गेली महीणाभरापासुन बंद आहेत.भारतीय जनता पार्टी आक्रमक झाली असून आज बिजीपी चे तालुका अध्यक्ष अजित पिंगळे यांनी कार्यकर्त्यांना सोबत घेत या व्हेंटिलेटर मशीन ची आज पूजा करत गांधीगिरी आंदोलन केले हे बंद असणारे व्हेंटिलेटर सुरू करा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ही या वेळी बिजीपी कडून देण्यात आला आहे.

त्यामुळे ते त्वरीत सुरू करावे यासाठी आंदोलन करण्यात आल असुन लवकरात लवकर व्हेंटीलेटर्स सुरू न केल्यास तिव्र आंदोलन करण्याचा इशारा भाजपाच्या वतीने देण्यात आलाय. यावेळी कळंब तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अजित पिंगळे भाजपचे नेते साहेबराव बोंदर भाजपा उस्मानाबाद जिल्हा उपाध्यक्ष प्रा.दिलीप पाटील,रामहरी शिंदे, कळंबचे चे शहराध्यक्ष भैय्या बाविकर ,सतपाल बनसोडे , शिवाजी गिड्डे, संजय जाधवर प्रशांत लोमटे, इम्रान मुल्ला यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

ग्लोबल न्युज नेटवर्क: