“भाजप वाइनबाबत एका राज्यात विरोध करते, तर दुसरीकडे स्वागत करत आहे”

 

राज्य सरकारने किराणा दुकानातून वाइन विक्री करणार नाही तसेच वाइन विक्रीचा निर्णय जनतेला विचारात घेऊन करण्याचे आश्वासन दिल्यामुळे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आजपासून सुरू होणारे नियोजित उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.पण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी याच मुद्द्याचा आधार घेत भाजपची वाइन विक्रीसंदर्भातील भूमिका दुटप्पी असल्याचा टोला लगावला आहे.

त्यांनी वाइन विक्रीला विरोध करणाऱ्या भाजपवर रविवारी सायंकाळी भुसावळमधील एका कार्यक्रमात बोलताना निशाणा साधला.भाजप वाइनबाबत एका राज्यात विरोध करते, तर दुसरीकडे स्वागत करत आहे, अशी स्थिती असल्याचे खडसे म्हणाले आहेत. वाइन ही दारू असल्यामुळे अण्णा हजारे यांनी यासाठी विरोध केला असल्याचे सांगण्यात येत असल्याचा उल्लेख करत खडसेंनी भाजपची सत्ता असणाऱ्या इतर राज्यांचे उदाहरण दिले.

मध्य प्रदेशमधील भाजप सरकारने मॉलमध्ये बिअर विकायला परवानगी दिली. आंध्र प्रदेशात भाजपला निवडून दिल्यास दारूही गरिबांच्या हिताची असल्यामुळे पन्नास रुपयांमध्ये दारू देऊ, असे वक्तव्य येथील प्रदेशाध्यक्षांनी केल्याचे खडसे म्हणाले आहेत. तसेच पुढे बोलताना खडसेंनी भाजपला थेट दुटप्पी भूमिकेवरुन प्रश्न विचारला आहे. वाइनबाबत भाजपची दुटप्पी भूमिका का?, असा सवाल एकनाथ खडसेंनी उपस्थित केला आहे.

Team Global News Marathi: