पाच राज्यांत भाजपचीच लाट; प्रचंड बहुमताने आमची सत्ता येईल : पंतप्रधान मोदी

पाच राज्यांत भाजपचीच लाट; प्रचंड बहुमताने आमची सत्ता येईल : पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली: देशभरातील पाचही राज्यांत विधानसभा निवडणुका असून, राजकीय वातावरण तापताना पाहायला मिळत आहे. यातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुका असलेल्या पाचही राज्यांत भाजपचीच लाट असून, जनता आम्हाला सेवा करण्याची संधी देईल. या पाचही राज्यांत भाजपची सत्ता येईल, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला.

एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या विशेष मुलाखतीत पंतप्रधान मोदी बोलत होते. गेल्या अनेक वर्षांपासून भाजपला मोठ्या प्रमाणात पराभवाचा सामना करावा लागला आहे. पराभवाची चव चाखतच भाजप या ठिकाणी येऊन पोहोचली आहे. भाजपने जेवढा मोठा पराजय पाहिला आहे, तेवढाच मोठा विजयही पाहिला आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले.

Speaking to @ANI. Watch. https://t.co/z0ybGugG6V

— Narendra Modi (@narendramodi) February 9, 2022

आताच्या घडीला देशातील पाच राज्यांमध्ये निवडणुका आहेत. या राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतल्यास या प्रत्येक ठिकाणी भाजपची लाट असल्याचे पाहायला मिळत आहे. या राज्यांमध्ये भाजपला प्रचंड बहुमत मिळेल. या पाच राज्यातील जनता भाजपला सेवेची संधी देईल. ज्या राज्यातील जनतेची सेवा करण्याची आम्हाला मिळाली, तेथे जनतेने आमचे काम पाहिले आहे. त्यामुळे तेथेही पुन्हा एकदा आमची सत्ता स्थापन होईल, असा दावा मोदी यांनी केला आहे.

The conventional notions of anti-incumbency don’t work while evaluating BJP Governments.

Based on our track record and delivery there is pro-incumbency for the BJP. pic.twitter.com/4bR2wGzd6P

— Narendra Modi (@narendramodi) February 9, 2022

आम्ही अनेक पराभव पाहिले आहेत. डिपॉझिट जप्त होताना पाहिले आहे. एकदा जनसंघाच्या वेळी निवडणुकीत पराभव झाल्यावर मिठाईदेखील वाटली जात होती. त्यावेळी मिठाई का वाटली जात आहे असा प्रश्न आम्ही केला. त्यावेळी तुमच्या तीन जणांचे डिपॉझिट वाचले असे आम्हाला उत्तर देण्यात आले, अशी एक आठवण पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितली.

जय पराजय दोन्ही आम्ही पाहिला आहे. जेव्हा आम्ही विजयी होतो तेव्हा आपण जमिनीवरच राहावं असे प्रयत्न आम्ही करतो. आम्ही जेव्हा निवडणुका जिंकतो तेव्हा आम्ही लोकांचं हृदय जिंकण्यात कधी कमतरता येऊ देत नाही. आमच्यासाठी प्रत्येक क्षण, योजना, काम जनतेचं हृदय जिंकण्यासाठी आहेत आणि त्यांना समाधान मिळतं तेव्हाच त्यांचं हृदय जिंकलं जातं, असंही ते म्हणाले.

Our effort is to take everyone along. We believe in unity in diversity and in all-round development. pic.twitter.com/jkGR40dT4p

— Narendra Modi (@narendramodi) February 9, 2022

यावेळी त्यांनी संसदेत माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यावर केलेल्या वक्तव्यावरही आपलं मत व्यक्त केलं. मी कोणाच्याही वडिलांचं, आईचं, आजोबांसाठी काही वक्तव्य केलं नाही. मी देशाच्या पंतप्रधानांनी काय सांगितलं ते म्हटलं. एका पंतप्रधानांचे हे विचार होते तेव्हा स्थिती काय होती आणि आजच्या पंतप्रधानांचे हे विचार आहेत तेव्हा स्थिती काय आहे, हे मी सांगितलं होतं, असंही त्यांनी नमूद केलं.

राजकारणातील घराणेशाहीवर कडाडून टीका

मी समाजासाठी आहे परंतु मी ज्या खोट्या समाजवादावर टीका करतो ती पूर्ण घराणेशाही आहे. लोहिया यांचं कुटुंब कुठे दिसत नाही. जॉर्ज फर्नांडिस यांचं कुटुंब कुठे नजरेस येत नाही. नितीश बाबूचं कुटुंब कुठे दिसत नाही अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकारणातील घराणेशाहीवर कडाडून टीका केली आहे.

युवाओं से मेरी अपील है कि वे इस बात को समझें कि परिवारवादी पार्टियां किस प्रकार लोकतंत्र के लिए बड़ा खतरा हैं… pic.twitter.com/RL0k2I89Dk

— Narendra Modi (@narendramodi) February 9, 2022

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, एकदा कुणीतरी मला चिठ्ठी पाठवली त्यात उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाच्या कुटुंबातील ४५ लोकं कुठल्या ना कुठल्या पदावर आहेत. त्यांच्या संपूर्ण कुटुंबात २५ वर्षाहून अधिक वयाच्या प्रत्येक व्यक्तीला निवडणुकीत लढण्याची संधी मिळाली आहे असं सांगितले होते. काही नेते स्वार्थासाठी एकमेकांचा विरोध करत असतात. मागील ५० वर्ष त्यांनी तेच केले. प्रत्येक गोष्टीत देशाच्या लोकांचं विभाजन केले आणि राज्य केले असं त्यांनी सांगितले.

भारतीय लोकशाहीसाठी घराणेशाही हा सर्वात मोठा शत्रू आहे. जेव्हा कुटुंब सर्वोच्च होतं तेव्हा कुटुंब वाचवा, मग भलेही पक्ष वाचेल किंवा नाही. देश वाचेल किंवा नाही असं होतं. हे सर्व होताना त्यात प्रतिमेचं मोठं नुकसान होतं. सार्वजनिक जीवनात जितक्या जास्त प्रतिमा येतील ते येणं आवश्यक आहे असंही मोदी यांनी सांगितले.

सुरक्षा त्रुटीवर वक्तव्य

पंजाबमधील फिरोजपुर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत झालेल्या त्रुटीची सर्वोच्च न्यायालयानं दखल घेतली आहे. तसंच या प्रकरणी समिती स्थापन करण्यात आली आहे. मुलाखतीदरम्यान या सुरक्षेतील त्रुटीप्रकरणी पंतप्रधानांना सवाल विचारण्यात आला. ‘मी या प्रकरणी मौन बाळगलं आहे. सर्वोच्च न्यायालय या प्रकरणाकडे गंभीरतेनं पाहत आहे. माझी कोणतीही भूमिका या तपासावर प्रभाव निर्माण करेल हे बिलकूल योग्य नाही. जे सत्य असेल ते त्या तपासाअंती समोर येईल,’ असं उत्तर त्यांनी दिलं.

भारतीय जनता पार्टी आज पंजाब में सबसे विश्वसनीय पार्टी के रूप में उभरी है… pic.twitter.com/IvOIsz2xaA

— Narendra Modi (@narendramodi) February 9, 2022

दहशतवादादरम्यान त्या ठिकाणची परिस्थिती बिकट होती, लोक रात्री घराबाहेर पडू शकत नव्हते. अशातच एकदा कार्यक्रमाला आम्हाला उशीर होत होता. आमची गाडी खराब झाली होती, त्यावेळी दोन शीख बांधव धावत आले. गाडीला धक्काही मारला परंतु गाडी सुरू झाली नाही. तेव्हा त्यांनी मला आणि चालकाला सोबत येण्यास सांगितलं. तसंच आमच्याकडे जेवा आणि तिकडेच रात्री राहण्यास सांगितलं. सकाळी त्यांच्या मुलानं एका मेकॅनिकला बोलावून गाडी ठीक करून दिली. त्या ठिकाणच्या लोकांच्या मदतीच्या स्वभावाला मी जाणतो, असंही ते म्हणाले.

योगींकडून यूपीतील सुरक्षिततेला प्राधान्य

उत्तर प्रदेश में पिछली सरकार के दौरान सुरक्षा व्यवस्था की जो बदहाली थी, उसकी यादें अब भी लोगों के मन में ताजा हैं। pic.twitter.com/Sc0eTOclb5

— Narendra Modi (@narendramodi) February 9, 2022

पंतप्रधान मोदी यांनी पुन्हा एकदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची पाठ थोपटत कौतुक केले आहे. योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशमधील सुरक्षिततेशी कधी तडजोड केली नाही, त्यांनी नेहमीच सुरक्षेला प्राधान्य दिले, असे मोदी यांनी म्हटले आहे. जेव्हा जनता यूपीच्या सुरक्षेबद्दल चर्चा करतात, तेव्हा ते मागील सरकारमधील माफियाराज, गुंडाराज होते. सरकारमध्ये बाहुबलींना आश्रय मिळत होता, याबाबतच चर्चा ऐकू येत होत्या. उत्तर प्रदेशमधील जनतेने या सगळ्या गोष्टी जवळून पाहिल्या आहेत. एका ठराविक वेळेनंतर महिला घराबाहेर पडू शकत नव्हत्या, अशी टीका मोदी यांनी केली.

भारतीय जनता पार्टी का मंत्र है, ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास और सबका प्रयास’। हमने अपने इस सिद्धांत को कभी बदला नहीं। pic.twitter.com/FfDacI9t81

— Narendra Modi (@narendramodi) February 9, 2022

भाजपचे योगी सरकार उत्तर प्रदेशमध्ये आल्यानंतर गुंडाराज, माफियाराज संपुष्टात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करण्यात आले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील सुरक्षितेला प्राधान्य दिले. अनेक नव्या गोष्टी राबवल्या. सुरक्षिततेशी कधीही तडजोड केली नाही. अंधार पडल्यानंतरही बाहेर पडू शकते, असे आज महिलांचे म्हणणे आहे. हा विश्वास सुरक्षिततेसाठी आवश्यक आहे. यूपीमध्ये एक काळ होता जेव्हा गुंड त्यांना हवे ते करू शकत होते. मात्र, आज तेच आत्मसमर्पण करतात, असे पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले.

तपास यंत्रणांचा गैरवापर नाही, उलट सरकारचं कौतुकच व्हायला हवं !

मोदी सरकारकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप विरोधकांकडून वारंवार करण्यात येतो. यावर मोदी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. देशात निवडणुका निर्धारित वेळेनुसार होत असतात आणि तपास यंत्रणा देखील त्यांच्या नियम व कायद्यानुसारच काम करत असतात. भ्रष्टाचारामुळे देशाचं खूप नुकसान झालं आहे आणि जर भ्रष्टाचाऱ्यांविरोधात कारवाई करून देशाच्या संपत्तीत भर पडत असेल तर उलट याबाबत केंद्र सरकारचं कौतुकच केलं गेलं पाहिजे, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

केंद्रीय तपास यंत्रणा त्यांचं काम नियम व कायद्यानुसार करत असतात. त्यात केंद्र सरकार कोणताही हस्तक्षेप करत नाही असं सांगतानाच पंतप्रधान मोदींनी विरोधकांवरही हल्लाबोल केला. भ्रष्टाचाराची वाळवी देशाला पोखरून काढत आहे. भ्रष्टाचाराविरोधात जनतेनं आवाज उठवला नव्हता का? मी जर जनतेनं उठवलेल्या आवाजासाठी काहीच केलं नाही तर मला जनता माफ करेल का? ज्या ज्या वेळी सरकारला भ्रष्टाचाराविषयीची माहिती मिळते तेव्हा मग कारवाई करायची नाही का? आणि जर भ्रष्टाचाराविरोधात कारवाई करुन कोट्यवधी रुपये देशाच्या तिजोरीत जमा होत असतील तर खरंतर सरकारचं कौतुकच करायला हवं, असं मोदी म्हणाले.

राष्ट्रहितासाठी कृषी कायदे रद्द

देशातील छोट्या शेतकऱ्यांच्याही वेदना समजू शकतो. राष्ट्रहितासाठी केंद्राने केलेले कृषी कायदे रद्द केले, असे स्पष्टीकरण मोदी यांनी दिले आहे. शेतकऱ्यांनी दिलेल्या मोठ्या लढ्यानंतर केंद्रातील मोदी सरकारने अखेर वादग्रस्त केंद्रीय कृषी कायदे रद्द केले. तसा ठरावही संसदेत मंजूर केला. मात्र, मोदी सरकारने निवडणुकीतील पराभवाच्या भीतीने कृषी कायदे रद्द केले. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घेतलेला हा राजकीय निर्णय होता, अशी टीकाही विरोधकांनी केली होती. यासंदर्भात पंतप्रधान मोदी यांना प्रश्न विचारण्यात आला होता.

शेतकऱ्यांची मने जिंकण्यासाठी आलो आहे आणि तसेच करण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले. छोट्या शेतकऱ्यांच्या वेदना मला कळतात. मी म्हणालो होतो की, शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतीविषयक कायदे लागू केले गेले, पण राष्ट्रहितासाठी ते मागे घेण्यात आले, असे पंतप्रधान मोदी यांनी स्पष्टपणे सांगितले. यापुढे पुन्हा एकदा शेतकरी बांधावांशी या कायद्यासंदर्भात चर्चा करून मनधरणी करण्याचा प्रयत्न करणार का, असा प्रश्न पंतप्रधान मोदी यांना विचारण्यात आला. यावर, शेतकरी बांधवांशी नेहमी आमचा संवाद सुरू असतो. अगदी अर्थसंकल्प तयार करतानाही आम्ही त्यांचे विचार घेतो. आपल्या देशातील छोट्यातील छोटा व्यक्तीही आपले विचार चांगल्या पद्धतीने मांडू शकतो. त्यांचे अनेक अनुभव आम्हाला उपयोगी पडतात. प्रशासनातील बाबू मंडळी आणि नेत्यांनाच सगळ्यातील सगळे कळते, असे नाही, असे मोदी म्हणाले.

गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांसाठी अनेक योजना घोषित करण्यात आल्या. मात्र, प्रत्यक्ष अंमलबजावणी फारशी झालेली दिसली नाही. आमचे सरकार सत्तेत आल्यावर आम्ही शेतकऱ्यांसाठी उपयुक्त योजना आणल्या. इतकेच नव्हे तर आता शेतकऱ्यांच्या खात्यात थेट योजनेचे पैसे पोहोचतात. यापूर्वी असे घडत नव्हते, असे शेतकरीच सांगतात आणि भाजपचा जयजयकार करतात, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: