शिवसेनेने शेअर केलेल्या बाळासाहेबांच्या व्हिडीओला भाजपकडून व्हिडिओ शेअर करून प्रतिउत्तर !

मुंबई | भारतीय जनता पक्षाचे काही लोक काल शिवसेना भवनासमोर आले होते. त्यांनी तिथे राडा करण्याचा प्रयत्न केला. राडा करणाऱ्यांना शिवसैनिकांनी शिवप्रसाद दिला आहे. हा विषय प्रसादापर्यंतच मर्यादित राहू द्या, शिवभोजन थाळी देण्याची वेळ येऊ देऊ नका, असा इशारा शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षाला दिला होता.

तसेच शिवसेनकडून एक शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा एक जुना व्हिडिओ शेअर करून भाजपाला टोला लागावण्यात आला होता. दरम्यान, आता भाजपानेही बाळासाहेबांचाच एक व्हिडीओ शेअर करून शिवसेनेला प्रत्युत्तर दिले आहे. भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी हा व्हिडीओ ट्विट करत टोला लगावला आहे.

 

भाजयुमोच्या फटकार मोर्चानंतर काही जणांनी शिवसेनाप्रमुखांचा व्हिडीओ पोस्ट केला होता. त्यांच्यासाठी सोनिया मातोश्रींचा आणि त्यांच्यासमोर वाकणाऱ्यांचा विशेष उल्लेख असलेला हा खास व्हिडीओ, असा खोचक टोला लगावत अतुल भातखळकर यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. या ट्विटमध्ये बाबासाहेब ठाकरे यांचे काँग्रेस विरोधातील भाष्य शेअर केले आहे.

Team Global News Marathi: